वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

एकार्जुना गावात भानामतीच्या अफवांनी भीतीचं सावटघरांच्या बाहेर निंबू, कुंकू, खोबरं, तांदूळ ठेवण्याचा रहस्यमय प्रकार; महिलांमध्ये व मुलांमध्ये भीतीचं वातावरण

एकार्जुना गावात भानामतीच्या अफवांनी भीतीचं सावट
घरांच्या बाहेर निंबू, कुंकू, खोबरं, तांदूळ ठेवण्याचा रहस्यमय प्रकार; महिलांमध्ये व मुलांमध्ये भीतीचं वातावरण

वरोरा-प्रतिनिधी १/३/२०२६

वरोरा शहरालगत असलेल्या एकार्जुना या गावात गेल्या काही दिवसांपासून भानामतीसारख्या घटनांमुळे गावकरी भयभीत झाले आहेत. २४ फेब्रुवारीपासून गावातील काही घरांच्या बाहेर दररोज तांदूळ, गहू, त्यावर निंबू, गुलाल, बुक्का, कुंकू आणि खोबरं अशा वस्तू ठेवण्यात येत असल्याचं निदर्शनास आलं आहे. हा प्रकार विशेषतः सकाळी ११.३० वाजता व सायंकाळी ६ नंतर घडत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
या घटनांमुळे गावात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेषतः महिलांमध्ये व लहान मुलांमध्ये भीतीचं सावट पसरलं असून, अनेकजण रात्री बाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहेत. काहींनी यामागे अंधश्रद्धा आणि भानामतीचा संशय व्यक्त केला आहे, तर काहींनी खोडसाळ प्रवृत्तींचा सहभाग असल्याचं मत मांडलं आहे.
या प्रकरणाची चर्चा गावभर रंगली असून नागरिकांमध्ये विविध अफवा पसरत आहेत.गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन या घटनेबाबत पोलिसांना लेखी तक्रार दिली आहे . गावात रात्री गस्त वाढविण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात आली आहे.
एकीकडे काही जण याला अंधश्रद्धेचा भाग मानत असले तरी सुशिक्षित वर्ग या घटनेकडे वास्तववादी दृष्टिकोनातून पाहत आहे. भीती न बाळगता पोलिसांच्या मदतीने सत्य समोर आणणे आवश्यक आहे, असे काही सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.
सध्या एकार्जुना गावात या रहस्यमय प्रकारामुळे तणावपूर्ण आणि भीतीचं वातावरण असून नागरिकांनी प्रशासनाने तातडीने या घटनेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.
****

Comments