वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने किशोर डुकरे यांची चंद्रपूर जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती

 प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने किशोर डुकरे यांची चंद्रपूर जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती

बेलोरा/अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने किशोर डुकरे यांची जिल्हाप्रमुख - प्रहार शेतकरी संघटना (चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

पक्षाचे कार्याध्यक्ष महेंद्र उर्फ बल्लू जवंजाळ यांनी दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी हे नियुक्तीपत्र वितरीत केले. भारतीय संविधानातील समाजवाद, धर्मनिरपेक्षता व लोकशाहीच्या तत्त्वांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्यामुळे डुकरे यांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे.

या नियुक्तीअंतर्गत विदर्भातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, कृषी कर्ज व इतर सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांना न्याय मिळवून देणे, ही प्रमुख कार्ये असतील. मात्र, ही नियुक्ती परिविक्षाधीन कालावधीसाठी असून, या कालावधीत कोणतेही मानधन, भत्ते किंवा आर्थिक सुविधा राहणार नाहीत, असे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

नियुक्ती स्वीकारल्यानंतर आपल्या कार्यक्षेत्रात विविध शाखांचे उद्घाटन वृक्षारोपण व रक्तदान शिबिराच्या माध्यमातून करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे विदर्भातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असून, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------

Comments