वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : कोंढाळा ग्रामस्थांवर कंपनीच्या कामात अडथळा आणल्याचा आरोपकिशोर डुकरे व प्रवीण गंधारे यांच्यासह ३० ते ३५ जणांवर गुन्हे दाखल.

वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : कोंढाळा ग्रामस्थांवर कंपनीच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप


वरोरा, ता. १६ फेब्रुवारी – श्री सिमेंट कंपनीच्या मालकीच्या जागेत बेकायदेशीरपणे प्रवेश करून कंपाऊंड भिंतीचे काम बंद पाडल्याप्रकरणी कोंढाळा गावातील सुमारे 30 ते 35 जणांच्या विरोधात वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी श्री सिमेंट कंपनीचे कॉर्पोरेट अफेअर हेड आशीष अनील कुलकर्णी (वय ४३, रा. वडगाव, चंद्रपूर) यांनी फिर्याद दिली आहे.
...................
फिर्यादीनुसार, दिनांक १६/०२/२०२६ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास किशोर डुकरे (रा. आसाळा) यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी कंपनीच्या मौजा कोंढाळा व निमसळा येथील जागेत अतिक्रमण केले. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी फिर्यादी यांच्या कंपनीचे वॉल कंपाऊंडचे काम करणाऱ्या मजुरांना धमकावून काम थांबविले.

फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपीगणांनी कंपनीचा ट्रक व जेसीबी अडवून काम बंद पाडले तसेच कामगारांना ‘जिवे मारून टाकण्याची’ धमकी दिली. या प्रकरणी प्रवीण गंधारे याने आरोपींना चिथावणी दिल्याचाही उल्लेख आहे.

फिर्यादीत हर्षद आवारी, संजय खिरटकर, ईश्वर देवतळे, प्रविण देवतळे, प्रभाकर गौरकर, प्रमीला गौरकार, धर्मेद्र ढेंगळे, समीर देवतळे, रमेश चिकटे, गोपाल पारखी, मंगेश चिकटे, इंद्रजीत देवतळे, विजय चिकटे, राजू विरूरकर, जगदीश पारखी, विपुल किन्नाके, अमोल देवतळे, विजय देवतळे, राकेश पारखी, चाखन गौरकर, पांडुरंग देवतळे, सुरेखा लभाणे, सुर्यभान शेरकुरे, बंडू पारखी, सविता देवतळे, कल्पना पायघन, शारदा बेलेकर, बेबी लालसरे, अनीता पारखी, ज्योती शिरसागर, लक्ष्मण सरपाते यांच्यासह इतर ३५ ते ५० जणांवर आरोप करण्यात आले आहे.

पोलिसांनी हे  प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले आहे. प्रकरण क्रमांक – ४५/२०२६ नुसार भा.न्या.सं. ३०९(४), ३५१(२), ३५२(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकाऱ्यारी मनीष जगन्नाथ तालेवार
पोलीस उपनिरीक्षक वरोरा यांचा तपास सुरू आहे.

किशोर डुकरे 
पोलिसांनी जे गुन्हे दाखल केलेले आहे ते चुकीचे आहे. आम्ही गावकऱ्यांच्या हितासाठी तिथे आंदोलन करत होतो. गावातील जमीन कंपनीकडे जात असल्याने गावाचे पुनर्वसन करावे. बेरोजगार युवकांना रोजगार द्यावा. आणि गावातील उर्वरित जमीन कंपनीने विकत घ्यावी. अशा काही मुद्द्यांवरती या ठिकाणी आंदोलन सुरू होते. 
.......................

Comments