वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

चंद्रपूरच्या आयुध निर्माणीत अनुकंपा नियुक्तीला मार्ग मोकळा; खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या पाठपुराव्याला यश

 चंद्रपूरच्या आयुध निर्माणीत अनुकंपा नियुक्तीला मार्ग मोकळा; खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या पाठपुराव्याला यश

चंद्रपूर/नई दिल्ली : आयुध निर्माणी चांदा येथील अनुकंपा आधारावर नियुक्तीसाठी वाट पाहणाऱ्या कुटुंबियांसाठी आशेचा किरण दिसून आला आहे. या प्रलंबित प्रश्नावर चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेल्या सातत्याच्या पाठपुराव्याला यश लाभले असून, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लगेचच २३ जणांना नियुक्ती देण्यासाठी 'वन-टाईम रिलॅक्सेशन' मंजूर केल्याचे कळले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार धानोरकर यांनी दिल्ली येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन चांदा येथील अनुकंपा धारकांच्या नियुक्तीचा प्रश्न तातडीने सोडवण्याची विनंती केली होती. संरक्षण मंत्र्यांनी या मागणीची दखल घेत लगेचच यासाठी सकारात्मक आश्वासन दिले आहे.

या आश्वासनानुसार, गेल्या तीन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या आणि लिखित परीक्षा उत्तीर्ण झालेल्या २३ अनुकंपा धारकांना त्वरित नियुक्ती देण्यात येणार आहे. तसेच, इतर सर्व पात्र उमेदवारांना 'वन-टाईम रिलॅक्सेशन' च्या तत्त्वावर १०० टक्के अनुकंपा नियुक्तीमध्ये समाविष्ट करण्याची मागणीही मंजूर करण्यात आली आहे. संरक्षण मंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे निर्देश दिल्याचे सूत्रांनी नोंदवले.

या यशाबद्दल खासदार प्रतिभा धानोरकर यांनी संरक्षण मंत्र्यांचे आभार मानताना म्हटले, "हा निर्णय केवळ काही कुटुंबांना नोकरी देणारा नाही, तर वर्षांपासून वाट पाहणाऱ्या शेकडो कुटुंबांना सामाजिक-आर्थिक सुरक्षा देणारा आहे."

हे आश्वासन येण्यापूर्वीच खासदार धानोरकर यांनी 'उमेद' योजनेतील कर्मचाऱ्यांच्या हक्कांचा मुद्दा केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांसमोर मांडला होता, ज्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे चंद्रपूरमधील ग्रामीण आणि औद्योगिक क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांच्या सातत्याच्या प्रयत्नांना चालना मिळाली आहे.

Comments