लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

नागपूर- चंद्रपूर हायवेवरील जीवघेणे खड्डे; सरकारी यंत्रणा कोणाच्या मृत्यूची वाट पाहत आहे?

नागपूर- चंद्रपूर हायवेवरील जीवघेणे खड्डे; सरकारी यंत्रणा कोणाच्या मृत्यूची वाट पाहत आहे का?

वरोरा :30/10/2025
नागपूर चंद्रपूर महामार्गावरील वरोरा  ते भद्रावती दरम्यानच्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडून रहिवाशांसाठी जीवघेणी समस्या निर्माण झाली आहे. या रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातांमुळे अनेक कुटुंबे बेघर झाली असून, स्थानिक लोक सरकारी यंत्रणेच्या उदासीनतेवर नाराज दिसत आहेत.

बारा ऑक्टोंबर ला टाकळी जवळील रस्त्यावर श्री. संदीप धरणेवार यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांना आणि त्यांच्या मित्राला तीव्र इजा झाल्या. अपघातग्रस्तांना दवाखान्यात दाखल करण्यात आले, जेथे त्यांच्या उपचारासाठी सुमारे ३ लाख रुपये इतका प्रचंड खर्च आला आहे.

श्री. धरणेवार यांच्या प्रकरणीच नव्हे, तर भद्रावती येथील आणखी ३ ते ४ व्यक्तींचे अशाच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात झालेले आहेत. स्थानिकांचा आरोप आहे की, मागील बऱ्याच महिन्यापासून रस्त्यावरील खड्डे  बुजविण्यात आलेले नाहीत, ज्यामुळे प्रवाशांचे जीविन दररोज धोक्यात आहे.

या संदर्भात एका स्थानिक नागरिकाने म्हटले आहे, "सरकारी यंत्रणा कोणाच्या मरणाची वाट बघत आहे का?" त्याने सोशल मीडिया ग्रुपमधील विविध पक्षांच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांना संबोधून केलेल्या विनंतीत म्हटले आहे, "आपण सर्व लोक समाजाची सेवा करण्यासाठी धडपडत आहात. ही पण एक सेवाच आहे. रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजविण्यासाठी संबंधित विभागाकडे कडक पावले उचलावीत."

या रस्त्याकडे जनप्रतिनिधीने लक्ष देऊन काम करून घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. अपघातग्रस्त रुग्णांनी स्थानिक प्रशासनाकडे हस्तक्षेपाची कडकडीची विनंती केली असून, लवकरात लवकर या समस्येचे निराकरण होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
------------

Comments