वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*खासदार प्रतिभा धानोरकरांचा 'चक्काजाम': नागपूर-चंद्रपूर महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प**"सातबारा कोरा" घोषणेची फसवणूक; तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा*

*खासदार प्रतिभा धानोरकरांचा 'चक्काजाम': नागपूर-चंद्रपूर महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प*

*"सातबारा कोरा" घोषणेची फसवणूक; तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा*


चंद्रपूर - अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महायुती सरकारला जाग आणण्यासाठी आज खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने नागपूर-चंद्रपूर महामार्ग ठप्प पाडला. "ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी द्या" या प्रमुख मागणीसाठी वरोरा येथील रत्नमाला चौकात हजारो शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी 'चक्काजाम' आंदोलन केले. सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली "सातबारा कोरा" करण्याची घोषणा खोटी ठरल्याचा संतप्त आरोप करत, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट बैलबंडीने तहसील कार्यालयात जाऊन प्रशासनाला धारेवर धरले.
 यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सरकारवर थेट हल्ला चढवत, निवडणुकीपूर्वी भाजपानं जाहीरनाम्यात केलेली ‘सातबारा कोरा’ करण्याची घोषणा निव्वळ फसवी ठरल्याचे ठणकावले. "महाराष्ट्रातील बळीराजा संकटात आला असून कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, पण तरीही महायुती सरकार मात्र फक्त मोठमोठ्या वल्गना करून रिकाम्या आश्वासनांची फसवी नाटकं करत आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. तसेच, चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना विशेष पॅकेज देऊन कापूस उत्पादकांना हेक्टरी १ लाख, तर सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी ५० हजार नुकसानभरपाई शासनाने त्वरित द्यावी, अशी ठाम भूमिका या आंदोलनातून घेण्यात आली. 

यावेळी चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मोठया संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. चंद्रपूर महामार्ग खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच शेतकरी यांनी खाली बसून अडवून धरल्यामुळे तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. मात्र रुग्णवाहिकेंना मार्ग मोकळा करून दिला जात होता. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल, तहसीलदार योगेश कोटकर, ठाणेदार तांबडे यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांना आश्वासन देऊन आंदोलन संपवण्याची विनंती केली मात्र प्रशासनाने ठोस आश्वासन द्यावे याकरता त्यानंतर खासदार प्रतिभा धानोरकर व आंदोलक हे बैलबंडीने तहसील कार्यालयात गेले आणि तहसीलदार योगेश कोटकर यांना निवेदन दिले.
  या आंदोलनात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे,चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी, प्रवीण काकडे,अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष सोहेलभाई रजा शेख,इंटक युवक काँग्रेस नेते प्रशांत भारती, वरोरा ग्रामीण तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर, भद्रावती तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, वरोरा शहराध्यक्ष विलास टिपले, भद्रावती शहराध्यक्ष सूरज गावंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजू चिकटे, गोपाल अमृतकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती  विशाल बदखल, शुभम चिमूरकर, हरीश जाधव,ऐश्वर्या खामनकर, संध्या पोडे, दिपाली माटे, सरीता सूर, छोटू शेख, राजू महाजन, अनिल झोटिंग, गणेश चवले,दिलीप टिपले, लक्ष्मण बोधाले, दिनकर ठेंगणे, वसंत विधाते, गिरीधर कष्टी, प्रदीप घागी यांसह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
*******

Comments