वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात भामडेळी येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू.

वनविभागाचे गावकऱ्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार

चंद्रपूर 
चेतन लूतडे 

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात दुपारी वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. ही घटना बुधवार दुपारी अंदाजे बारा वाजता भांमडेळी गावाजवळ घडली.


मृतक अमोल बबन नन्नावरे (वय ४५) हे भांमडेळी गावाचे रहिवासी होते. स्थानिक नागरिकांनुसार, इरई धरणाच्या बाजूला  ते शेतातील  कापूस पिकावर फवारणी मारत असताना अचानक जंगलातून बाहेर आलेल्या भीमा नावाच्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी त्यांचे वडील आणि मित्र त्या ठिकाणीच काम करीत होते. आरडा ओरड केल्यानंतर काही वेळाने मृतदेह सोडून वाघ जंगलात गेला. मात्र तोपर्यंत नन्नावरे  यांचा जीव गेला होता.  वनविभाग गावकऱ्यांच्या तक्रारी व सूचनावर लक्ष देत असून प्राण्यांचे हल्ले गावकऱ्यांवर वाढलेले आहे.

घटनेची खबर मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात नेण्यात आले असून, घटनेची तपासणी सुरू आहे. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्या रोष व नैराश्याचे वातावरण आहे.
या घटनेमुळे अमोल नवरे यांच्या कुटुंबावर मोठा धक्का बसला आहे. ते आपल्या पत्नी आणि दोन मुलांसहित एक छोटेसे कुटुंब सोडून गेले आहेत. त्यांचा मृत्यू या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या उघड्यावर पडण्यासारखी परिस्थिती निर्माण करेल, अशी चिंता नातेवाईक व्यक्त करत आहेत.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरील गावांमध्ये माणस आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष वाढत आहे. गेल्या काही वर्षांत या परिसरात वाघ, बिबट इत्यादी वन्यजीवांचे हल्ले वाढले आहेत, ज्यामुळे स्थानिक शेतकरी आणि रहिवाशांचे जीवन धोक्यात असल्याची चिंता गावकरी करीत आहे. 

Comments