लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

जागतिक गोंड सगा मंडळ, वरोरा यांचा आदिवासी आरक्षणावरचा निर्णय विरोधासाठी उठाव

जागतिक गोंड सगा मंडळ, वरोरा यांचा आदिवासी आरक्षणावरचा निर्णय विरोधासाठी निषेध 

फक्त बातमी 
चेतन लूतडे 

वरोरा, चंद्रपूर: महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला जात प्रमाणपत्र देण्यासाठी हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, बंजारा, विमुक्त व भटक्या जमाती आणि धनगर समाजालाही तेच लागू करून त्यांना आदिवासी प्रवर्गाचे आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. या मागणीवर आदिवासी समाजाचा तीव्र विरोध आहे आणि शासनाने असे केल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
जाहिरात
जागतिक गोंड सगा मंडळ, वरोरा शाखेचे अध्यक्ष श्री. सुरेशराव तिकराम मडावी यांनी राज्यपाल आणि उपविभागीय अधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात हा विरोध नोंदवला आहे. संस्थेचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. विजयराव पुंजराव परचाके आणि श्री. संजूसिद्ध  मेश्राम यांनीही या भूमिकेला पाठिंबा दर्शविला आहे.

निवेदनात म्हटले आहे, "अनुसुचित जमातीचे आरक्षण हे संविधानाने आदिवासी समाजाचा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकास करण्यासाठी दिलेले आहे. ह्या आरक्षणात इतर जातीचा समावेश करणे म्हणजे आदिवासी समाजाच्या हक्कावर गदा आणणे होय. असा आदिवासी समाजावर अन्याय करणारा निर्णय सरकारने घेतल्यास समस्त आदिवासी समाज विरोधात पेटून उठल्याशिवाय राहणार नाही."

आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये इतर कोणत्याही जमाती किंवा जातीचा समावेश करू नये, अशी विनंती त्यांनी शासनाकडे केली आहे. बंजारा, विमुक्त व भटक्या जमाती आणि धनगर समाज आपल्या मागण्यांसाठी आंदोलने करत असताना, आदिवासी संघटनांनी याला विरोध करण्याचा निर्धार केला आहे. यामुळे राज्यात एक नवीन समाजिक व राजकीय वाद निर्माण झाला आहे.

यावेळी निवेदन देण्यासाठी सुरेशराव मडावी, भास्कर तुमराम, सामाजीक कार्यकता प्रभाकरजी आडे ,प्रकाश तोडासे -,प्रभाकर कुडमिये,मनीष तोडासे, देविदास टेकाम, ऐकनाथ कुडमिये, बळवंत आजम, अनुबाई येडमे, वनिता परचाके सामाजीक कार्य,योगीता मेश्राम,विनलाई किन्नाके,रंजना,कलाबाई मडावी,साधना कोटनाके,वर्षाली परचाके, शिल्पा तोडासे,संगीता गेडाम



Comments