लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*"वोट कि चोरी नहीं चलेगी" – राहुल गांधी**

इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढला.

**"वोट कि चोरी नहीं चलेगी" – राहुल गांधी**  

११ ऑगस्ट २०२५ : 
फक्त बातमी 

"*मोदी सरकार कायर है... **" या घोषणेखाली सोमवारी इंडिया आघाडीच्या  महिला खासदारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात ठोस आवाज उठवला. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा, खासदार प्रतिभा धानोरकर  आणि खासदार वर्षा गायकवाड सह अनेक काँग्रेस महिला खासदारांनी  नारीशक्तीने रस्त्यावर उतरून मतदारांचे हक्क रक्षण्याची हाक दिली आहे.
खासदार प्रियंका वाड्रा  यांच्या नेतृत्वात संसदेच्या रस्त्यावर उतरून निर्वाचन आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले .
खासदार प्रतिभा धानोरकर , आमच्या जिल्ह्यातही दहा ते पंधरा हजार मतदान वाढलेले आहेत. याबाबत आम्ही पिटीशन दाखल करून सुद्धा आम्हाला उत्तर मिळाले नाही. बोगस मतदान झालेल्या प्रकरणात निर्वाचन आयोगाने जनतेपुढे उत्तर द्यावे.

या निषेधाच्या पार्श्वभूमीवर खासदार राहुल गांधी यांनी ऐतिहासिक विधान केले:  
One man one vote.
**"वोट कि चोरी नहीं चलेगी!** (मतांची चोरी आता चालणार नाही!) *महाराष्ट्राच्या विधानसभा झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. *महाराष्ट्रामध्ये 40 लाख बोगस वोटर घुसवण्यात आले होते. *मतदार यादी मध्ये बनावट वोटर ची नावे आहेत. गेल्या पाच महिन्यात एक कोटी बोगस मतदान दाखवून भाजप आणि निर्वाचन आयोग यांनी मिळून मते चोरली आहे. त्यामुळेच महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये याच प्रकारे काँग्रेसचे उमेदवार पडले. याच पद्धतीने समोर येणार्या निवडणूका सुद्धा भाजपा जिंकली? असा खळबळ जनक आरोप खासदार राहुल गांधी पत्रकार परिषदेत  केला आहे. लोकशाहीला वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू असा विश्वास जनतेला त्यांनी दिला आहे. 

 काँग्रेस खासदार व इतर आघाडी नेत्यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे रस्त्यावर झालेल्या प्रदर्शनाने सत्ताधाऱ्यांना स्पष्ट सूचित केले आहे: वोट की चोरी नही चलेगी l "सावित्रीच्या लेकी" आता लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या  आहे.

************


****


Comments