वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

श्री संत गजानन महाराजांच्या अमृतकण प्रवचनात भक्तांच्या जीवनातील भाग्याचे लक्षण म्हणजे महाराजांची कृपा — प्रा. सुरेश शेवडे

*श्री संत गजानन महाराजांच्या अमृतकण प्रवचनात भक्तांच्या जीवनातील भाग्याचे लक्षण म्हणजे महाराजांची कृपा — प्रा. सुरेश शेवडे*  

*वरोरा* : 
श्री संत गजानन महाराजांचे जीवन अलौकिक चरित्र आणि आध्यात्मिक शिकवणींनी भरलेले आहे. त्यांच्या जीवनातील प्रसंग आणि कृपा भक्तांच्या भाग्याचे लक्षण आहे, असे प्रतिपादन *गजानन बावन्नी*चे रचयिते प्रा. सुरेश शेवडे (आबा) यांनी श्री संत गजानन महाराज भक्त परिवाराच्या *अमृतकण* प्रवचन कार्यक्रमात केले.  

९० वर्षीय प्रा. शेवडे यांनी महाराजांच्या चरित्रातील अनेक अनुभव रसाळ शैलीत सांगितले. *"महाराज गुणातीत आहेत. त्यांना सदाचारी भक्त प्रिय आहेत. ज्यांनी मनापासून श्रद्धा केली, त्यांच्या जीवनात महाराज स्वतः प्रकट झाले आणि कृपा केली,"* असे ते म्हणाले.  

हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व आणि गजानन महाराजांचे तत्त्वज्ञान*
प्रा. शेवडे यांनी हिंदू धर्माच्या वैशिष्ट्यावर प्रकाश टाकताना सांगितले, *"हिंदू धर्म ईश्वरप्रणीत असून तो जगातील श्रेष्ठ धर्म आहे. इतर धर्म मानवनिर्मित पंथ आहेत, म्हणूनच वेद-पुराणे जगभर पूज्य मानली जातात."*  

*पादुका परिक्रमा आणि भक्तांचा उत्साह**  
कार्यक्रमापूर्वी वरोरा नगरात पादुका परिक्रमा आयोजित करण्यात आली होती, जिथे रांगोळी आणि पुष्पवृष्टीने भक्तांनी स्वागत केले. यावेळी *बाळकृष्ण कुळसंगे (उल्हासनगर)* यांनी आपले अनुभव सांगितले तसेच *अमृतकण* या ग्रंथाचे विमोचनही करण्यात आले.  

कार्यक्रमाचे संचालन *उमेश लाभे* यांनी तर प्रास्ताविक *राजीव दोडके* यांनी केले. मुंबई, यवतमाळ, चंद्रपूरसह अनेक भागांतून आलेल्या भक्तांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.  

**भक्ती आणि सदाचाराचा संदेश देणारा हा प्रसंग भाविकांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.**  


Comments