वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वारा-पावसामुळे वरोरा शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान, जनजीवन बाधित


वारा-पावसामुळे वरोरा शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान, जनजीवन बाधित

वरोरा (चेतन): 9/6/2025
सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे वरोरा शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कच्च्या घरांची पडझड, झाडे उन्मळून पडणे, विजेच्या खांबांची दुरावस्था अशा समस्यांना तालुक्यातील लोक सामोरे गेले आहेत.  

वाऱ्याच्या जोरामुळे तालुक्यातील अनेक कच्ची घरे कोसळली असून हुडकी येथे अनेक घरांची छपरे उडून गेली आहेत. यामुळे गरीब घरांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. तसेच, आनंदवन परिसरात अनेक मोठी झाडे रस्त्यावर पडली असून काही मार्ग सकाळपर्यंत बंद होते. जिल्हा परिषद शाळेच्या आवारात झाड पडले असून, सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.  
विजेच्या खांबांना झालेल्या नुकसानामुळे तालुक्यातील अनेक भागात विजेचे पुरवठ्यात व्यत्यय आला होता. विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लाईन दुरुस्तीसाठी तातडीने काम सुरू केले आहे.  

या संकटकाळात गरजूंना मदत मिळावी यासाठी संबंधित विभागाने लगेच दखल घेऊन पुनर्वसनाच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. तालुक्यातील प्रशासनाकडून पीडितांना तातडीने मदत करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
...........

Comments