वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*अवकाळी वादळामुळे किन्हाळा परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान**

**अवकाळी वादळामुळे किन्हाळा परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान**

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधाकर रोहनकर यांची गावकऱ्यांना भेट.  

*भद्रावती* : भद्रावती तालुक्यातील किन्हाळा गावात अवकाळी वादळ आणि प्रचंड वाऱ्यामुळे गावाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळाच्या जोरामुळे घरांची टिनाची छतं, कवेलू उडून गेली आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या धान्य व घरगुती सामानाचा मोठा नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विजेचे खांब कोसळून घरांना धोका निर्माण झाला आहे.  

या वादळाचा प्रभाव किन्हाळा, कोकेवाडा, सोनेगाव तुकूम, आष्टा परिसरातील इतर गावांवरही झाला आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष  सुधाकर रोहनकर यांनी घटनेची माहिती देत संबंधित अधिकाऱ्यांना अवगत करून दिले आहे. प्रशासनाने तातडीने पाहणी करून पोल दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. विजेचा पुरवठा संध्याकाळपर्यंत सुरळीत होईल, असे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता शाहू  यांनी आश्वासन देण्यात आले आहे.  भद्रावती पंचायत समिती संवर्ग अधिकारी आशितोष सपकाळ यांनी टीम पाठवून पंचनामा करण्याचे आश्वासन दिले.

तहसीलदार भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल सेवक बुरचुंडे व तलाठी सलोटे यांनी गावातील नुकसानीचा पंचनामा केला आहे. या आपत्तीमुळे जीवितहानी झाली नसली तरी घरदार व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून पीडितांना मदत करण्याच्या प्रयत्नांसाठी पाठपुरावा केला जात आहे.  

ग्रामपंचायत सदस्य बालू मंगाम, गावातील पोलीस पाटील मुंढरे, विजय चौधरी यांनी तालुकाध्यक्ष सुधाकर रोहनकर यांच्यासोबत गावातील प्रत्येक घराची पाहणी करून गावकऱ्यांची विचारपूस केली. हे गाव ताडोबा लगत असून भद्रावती तालुक्यातील शेवटचे टोक समजले जाते. त्यामुळे विकासापासून बरेच वंचित असल्याने शासनाचे लक्ष अजून पर्यंत या गावाकडे वळले नाही. अशी संवेदना गावकऱ्यांनी व्यक्त केली ‌.




Comments