वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

17 दिवसापासून शेतकऱ्याचे आमरण उपोषण वरोरा येथील आबा मक्ता येथील शेतकऱ्याला केले भूमीहीन.

17 दिवसापासून शेतकऱ्याचे आमरण उपोषण 

वरोरा येथील आबा मक्ता येथील शेतकऱ्याला केले भूमीहीन.

वरोरा 
चेतन लूतडे 

वरोरा तालुक्यातील आबा मक्ता या गावांमध्ये गेल्या 40 वर्षापासून वन हक्काच्या अतिक्रमित जागेवर शेती करीत असलेल्या शेतकऱ्याला भूमिहीन करण्यात आले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचा परिवार उघड्यावर पडला असून गेल्या 17 दिवसापासून आमरन उपोषणासाठी शेतकरी आपल्या शेतात बसले आहे. 

सर्वे क्रमांक 83 मध्ये विद्युत विभागाचे १३ kv सब स्टेशन बनणार असून यासाठी ग्रामपंचायतीने साठ आर जमीनचा ठराव मंजूर करून विद्युत विभागाच्या ताब्यात दिली आहे. केल्या कित्येक वर्षापासून शेतकरी याच जागेवरती आपली शेती करीत होता. त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी आली आहे. 

मात्र आता प्रशासनाने आपला प्रस्ताव बदलला असून शेतकऱ्याची ही जमीन नाही ती  सर्वे नंबर 92 मध्ये आहे. असा चुकीचा प्रस्ताव केला आहे. पण या वन हक्क अतिक्रमित जागेवरती दुसराच शेती वाहत आहे.

८३ आर मध्ये दोन हेक्टर शेती वरती शेतकरी विकास बाळकृष्ण खोब्रागडे हे गेल्या 40 वर्षापासून शेती करीत आहेत. मात्र कराची पावती भरत असताना 92 सर्वे नंबर  वरती टॅक्स देऊन  चुकीची पावती भरण्यात आली होती. शेतकऱ्याला हाच सर्वे नंबर 92 आहे असा समज दिला होता. शेतकरी शिक्षित नसल्याने या बाबीचा उलगडा झाला नव्हता. मात्र आता सरकारने विद्युत विभागातर्फे नवीन सबस्टेशन बनविण्यासाठी सर्वे नंबर 83 मधील जागा देऊन या शेतकऱ्याला भूमीहीन केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

ही बाब माहिती होताच भीम आर्मी व भारत एकता मिशन चंद्रपूर यांनी शेतकऱ्याला पाठिंबा दर्शवित वरोरा येथे पत्रकार परिषद घेतली.
यामध्ये शेतकऱ्याची पूर्ण जमीन मोजावी. व उर्वरित जमीन वाहण्यासाठी देण्यात यावी. या पद्धतीची मागणी करण्यात आली आहे. 
मात्र अजूनपर्यंत प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतली नसून शेतकऱ्याला समजावण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मार्गाने करणे सुरू आहे. गावातील सरपंचांनी सुद्धा या बाबीची दखल न घेतल्याने शेतकऱ्याने आपल्या शेतातच उपोषण सुरू केले आहे. 
लोकप्रतिनिधी,जिल्हाधिकारी, महसूल प्रशासनाला याबाबत  बरेच निवेदन दिले असून अजून पर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही.
त्यामुळे भीम आर्मी आणि भारत एकता मिशन चे अतुल पाटील तालुका संघटक, भाग्यश्री पवार, उपेंद्र ढोक  यांनी शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून भूमीन केलेल्या शेतकऱ्याला जोपर्यंत योग्य न
न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा लढण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.



Comments