वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*कारागृहातील बंदीवानांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम*

*चंद्रपूर, दि. 25 मार्च :* सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबईतर्फे 'जीवन गाणे गातच जावे', हा सांस्कृतिक कार्यक्रम मंगळवारी चंद्रपूर जिल्हा कारागृह येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारागृह अधिक्षक अनुप कुमरे तर प्रमुख अतिथी म्हणून कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, कौशल्य विकास अधिकारी रोशन गबाले, कारागृहाचे वरिष्ठ निरीक्षक नागेश कांबळे, सतीश सोनवणे, कमलाकर मिरासे, ॲङ चैताली बोरकुटे – कटलावार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना कारागृह अधिक्षक श्री. कुमरे म्हणाले, बंदिवानांना कारागृहात आनंदी वातावरणात जगण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे शासनाचे निर्देश आहे. यात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यातीलही कलागुणांना विकसीत करणे, चांगले वर्तन ठेवण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे आदींचा समावेश आहे. सहायक आयुक्त श्री. येरमे म्हणाले, आनंद हा आपल्यातून निर्माण झाला पाहिजे. चांगले काय आणि वाईट काय, याची पारख करून आपण ते स्वीकारावे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंदी जीवन जगण्यास नक्कीच मदत मिळते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री. येसनकर यांनीसुध्दा मार्गदर्शन केले. 
यावेळी बंदीवासांसाठी योग नृत्य परिवारातर्फे सुरेश घोडके आणि समूह यांनी अधिवासांना योगा शिकवला. गुन्हेगाराची सायकॉलॉजी या विषयावर धनंजय तावडे यांनी मार्गदर्शन केले. गुन्हेगारीचे दुष्परिणाम व गुन्हे सोडल्यावरचे जीवन या विषयावर ऍडव्होकेट चैताली बोरकुटे-कटलावार यांनी मार्गदर्शन केले. कला श्री आर्ट फाउंडेशनच्या मुलींनी व शिक्षिका स्नेहा पारवेकर यांनी कथक व देशभक्तीपर नृत्य सादर केले. त्यानंतर बंदीवासांसाठी संस्कृती देशभक्ती प्रबोधनपर स्वरसुगम संगीत ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला. त्यात देशभक्तीपर थोर महापुरुषांवर व संस्कृती हा विषय घेऊन अतिशय दर्जेदार गीते सादर करण्यात आली. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेजराज चिकटवार, वैशाख रामटेके, रोहित रामटेके, प्रदीप यमनूरवार व सुशील सहारे यांनी सहकार्य केले.
००००००

Comments