वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

जिल्हाधिकारी रमले विद्यार्थ्यांसोबत, अंगणवाडी व आश्रमशाळेत संवाद* *अंधारी नदीवरील पुलाच्या बांधकामाची पाहणी*

*जिल्हाधिकारी रमले विद्यार्थ्यांसोबत, अंगणवाडी व आश्रमशाळेत संवाद*
 *अंधारी नदीवरील पुलाच्या बांधकामाची पाहणी*

चंद्रपूर, दि. 5 मार्च : राज्य शासनाच्या सात कलमी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बुधवारी आश्रमशाळा तसेच अंगणवाडी येथे भेट देऊन चिमुकल्यांशी संवाद साधला. यावेळी चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी चंद्रपूर तालुक्यातील इंदपवार आदिवासी आश्रम शाळा बोर्डा येथे भेट देऊन आश्रमशाळेची पाहणी केली. तसेच विद्यार्थी व कर्मचारी यांचेशी संवाद साधला. तसेच आदिवासी आश्रम शाळा बोर्डा येथे सुरू असलेल्या नवीन बांधकाम इमारतीची पाहणी केली. विद्यार्थ्यार्थ्यांची अभ्यासाच्या प्रगतीबाबत चौकशी केली.
तसेच मौजा पाहामी येथील अंधारी नदीवर सुरू असलेल्या नवीन उडान पुलाची पाहणी करून जिल्हाधिका-यांनी बांधकामाबाबत आढावा घेतला. यावेळी त्यांनी अंधारी नदीपासून दीड किलोमिटर अंतरावर असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वसलेल्या पाहामी गावात जाऊन गावातील नागरीकांची भेट घेतली. सदर भेटीदरम्यान पहामी येथील अंगणवाडी केंद्रातील सेविकेशी व शिकत असलेल्या विद्यार्थ्याशी संवाद साधून व्यवस्थेचा आढावा घेतला. 
जिल्हाधिकारी प्रथमच गावात आल्याने सर्व गावकरी भारावून गेले. यावेळी कोळसा ग्रामपंचायतीचे सरपंच माधुरी वेलादी, पोलीस पाटील भिमराव सोयाम, अंगणवाडी सेविका माया सोयाम तसेच गावातील अन्य नागरीक उपस्थित होते.
००००००

Comments