वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

रन फोर लेप्रसी कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर विकास आमटे यांच्या हस्ते पारितोषकाचे वितरण


रन फोर लेप्रसी कार्यक्रमाचे आयोजन 

डॉक्टर विकास आमटे यांच्या हस्ते पारितोषकाचे वितरण

वरोरा 
चेतन लूतडे वरोरा 

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा कुष्ठरोग, तालुका आरोग्य अधिकारी, महारोगी सेवा समिती संचालित आनंद निकेतन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'रन फॉर लेप्रसी' कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी करण्यात आले.
कृष्ठरोग प्राचीन काळापासून चालत आलेला आजार आहे तो मुख्यत्वे बॅक्टेरिया पासून होतो. समाजामध्ये आजही फार मोठ्या प्रमाणावर गैरसमजुती आहेत.  कुठल्यातरी पाप आपल्या हातून झाले असेल कृष्ट रोगाची लागण झाली असेल . त्यामुळे अंगावरची चट्टे लपवण्याचा प्रयत्न करतो हा बॅक्टेरियामुळे होणारा आजार असल्यामुळे औषध उपचाराने तो 100% बरा करता येतो.  आणि लागण होणारा आजार असला तरी खूप जास्त कालावधी लागण होण्यासाठी लागतो. औषध उपचारांनी शंभर टक्के बरा होणारा आजार आहे आणि याची जनजागृती लोकांमध्ये यावी लोकांना कुष्ठरोगांबद्दल, पीडित रुग्णांबद्दल आदर निर्माण व्हावा सन्मान निर्माण व्हावा. आणि कुष्ठरोग हे फक्त विभागामार्फत चालवलेला कार्यक्रम न राहता लोक चळवळ व्हावी लोकांनी समोर येऊन झालेल्या आजाराचे औषधी उपचार करावे. यानिमित्ताने आनंदवन महाविद्यालयाच्या प्रांगणात रन फॉर रेप्रसि हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये सर्व वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग दर्शविला. यामध्ये स्पर्धकांना पारितोषिक  डॉक्टर विकास आमटे यांच्या हस्ते देण्यात आले. 
  
यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात आपल्याकडे 1500  कृष्टरुग्ण आहेत .जे औषध उपचार घेत आहेत आणि या वर्षात साधारणपणे 1955 नवीन रुग्ण शोधलेले आहेत.याच्यात आनंदाची बाब म्हणजे एकाही कृष्ट रुग्णाला कुठली दुष्टीदोष स्वरूपाची विकृती नाही. सगळे रुग्णांना आपण शंभर टक्के औषध उपचार देत आहोत .

Comments