वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

गजानन नगरी वार्डातून बुलेट चोरीला. मोपेट दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांचा प्रताप.

गजानन नगरी वार्डातून बुलेट चोरीला. 
मोपेट दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांचा प्रताप.

वरोरा 
चेतन लूतडे 

दुचाकी वाहन चोरीच्या घटना वरोरा शहरात मोठ्या प्रमाणात घडत असून बाहेरील गावातून संध्याकाळला तीन-चार युवक येऊन दुचाकी चोरून नेण्याचा प्रताप मोठ्या प्रमाणात होत आहे.

वरोर शहरातील गजानन नगरी येथील  सालवटकर यांच्या घरी गेटच्या आत बुलेट क्रमांक  Mh34-BN2137  ठेवलेली चोरून नेण्यात आली. याच ठिकाणी बऱ्याच किरायदारांच्या पाच-सहा दुचाकी ठेवलेल्या होत्या. मात्र महागाची गाडी समजून बुलेटला या चोरट्याने चोरून नेली आहे. 

11/3/2025 रोजी 3.30 च्या पहाटेच्या सुमारास  तीन युवकांनी दुचाकी मोपेड वर येऊन घराच्या आतील ठेवलेली बुलेट लॉक तोडून चोरून नेली. सकाळी हा सगळा प्रकार बुलेट मालकाच्या निदर्शनास आला. 
या सगळ्या घटनेवरून अक्षय राऊत यांनी पोलीस स्टेशन वरोरा येथे तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहे.  
Mh34-BN2137 या नंबरची बुलेट किंवा विना नंबर प्लेट संशयित असलेली बुलेट कुठेही दिसल्यास पोलिसांना किंवा अक्षय राऊत यांना संपर्क करावा अशी विनंती केली आहे. 

यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेज गोळा केले असून तीन युवक शहरामध्ये मोपेड दुचाकी वाहनावर पांढरे लाईट सुरु करून जेणेकरून नंबर प्लेट सीसीटीव्हीत दिसणार नाहीत अशा संशयित युवकांना सीसीटीव्हीत फिरताना दिसले आहे. चोरलेली बुलेट आनंदवन चौक येथून चंद्रपूरच्या दिशेने गेल्याचे निदर्शनास आले आहे. या संबंधित चोरट्यांचे चेहरे लक्षात घेऊन त्यांना लवकरच गजाआड टाकतील अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे. 


Comments