वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वरोरा पोलीसांची मोठी कारवाई आरोपीकडून १ किलो ९९२ ग्रॅम वजनाचा गांजा पकडला

वरोरा पोलीसांची मोठी कारवाई आरोपीकडून १ किलो ९९२ ग्रॅम वजनाचा गांजा पकडला

वरोरा 13/3/2025
चेतन लूतडे 

 वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत टेमुर्डा येथे. १३/०३/२०२५ रोजी  पो.स्टे. प्रभारी अधिकारी आणि डी. बी. स्टॉप सह होळी सणानिमीत्त अवैध्य धंदयावर रेड कामी पेट्रोलिंग करीत असतांना एक ईसम  टेमुर्डा येथील चौकात संशयीतरित्या हातात बॅग घेवून उभा दिसला या वरून त्याची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता त्याने स्वतःच्या आर्थिक फायदया करीता मनोव्यापारावर परिणाम करणारे घटक असलेला ओलसर कॅनॉबिस/गांजा वनस्पतीचे पाने, फुले व बिया यांची विक्री करण्याकरिता आढळून आला. सदर आरोपीच्या जवळ असलेल्या निळया/काळया रंगाच्या बॅगमध्ये १ किलो ९९२ ग्रॅम वजनाचा गांजा बाळगुण असतांना रंगेहात पकडण्यात आले. 
आरोपी नामे प्रफुल किशोर रामटेके वय २९ वर्ष रा. कॉलरी वार्ड वरोरा ता. वरोरा याचे विरूद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाक करणारे पदार्थ अधिनियम (N.D.P.S. Act) १९८५ मधील कलम ८ (क), २० (ब), ii (ब) N.D.P.S. Act कायदा अन्वये पोलीस स्टेशन वरोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.श्री पोलीस अधिक्षक सा. चंद्रपूर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक मॅडम चंद्रपूर, मा. नयोमी साटम , सहायक पोलीस अधिक्षक तथा पोलीस उपविभागीय अधिकारी, वरोरा यांचे मार्गदर्शनामध्ये पोलीस ठाणे वरोराचे ठाणेदार अजिंक्य तांबडे, सपोनि. शरद भस्मे, पोउपनि, दिपक ठाकरे, पो. अं. संदीप मुळे, पो. अं. विशाल राजुरकर, पोहवा मोहन निषाद, दिलीप सुर, अमोल नवघरे, मनोज ठाकरे, महेश गावतुरे यांनी केली.

Comments