1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

*आरटीओच्या वायुवेग पथकाद्वारे 13 टिप्पर वाहनांवर कारवाई*

*आरटीओच्या वायुवेग पथकाद्वारे 13 टिप्पर वाहनांवर कारवाई*

चंद्रपूर, दि. 17 मार्च :  चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या  वायुवेगपथकाने अचानक भेट देऊन प्रकल्पाच्या मागील भागातील सायवान परिसरात कडक तपासणी करून 13 टिप्पर वाहनांवर कारवाई केली.

कारवाई करण्यात आलेल्या सहा वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात अटकाव करून ठेवण्यात आले तर उर्वरित वाहनांना चालान देण्यात आले आहे.  केंद्रीय मोटार वाहन  नियम 138 नुसार, एकरुप नसलेला माल  हा व्यवस्थितरित्या ताडपत्रीने आच्छादित करून किंवा बंद कंटेनरद्वारा वाहतूक करणे अत्यावश्यक असतांना सदर वाहनातील राखेवर  फक्त ग्रीननेटचे आवरण होते. राखेला व्यवस्थितरित्या आच्छादित न करता वाहतुक  करणाऱ्या वाहनांवार मोटार वाहन कायाद्यातर्गंत कडक कारवाई करण्यात येते. 

तसेच याबाबत सीटीपीएसच्या वरिष्ठ  अधिका-यांशी भेट घेऊन सदर राख आच्छादित न करता वाहतुक केल्याने होणाऱ्या दुष्परिणामाबाबतचे सांगण्यात आले. सार्वजनिक परिसरात वाहतुक न करता सीटीपीएस स्तरावर प्रकल्पातर्गंतच्या जागेवर राखेची विल्हेवाट लावावी, असेही निर्देश देण्यात आले. चंद्रपूर थर्मल पॉवर  स्टेशन  सीटीपीएस येथून उत्पन्न होणारी राख एएसएच सुरक्षित आणि नियमानुसार होण्यासाठी  आरटीओ  कार्यालयाकडुन सीटीपीएस प्रवेशद्वारावर निरीक्षण ठेवण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात येईल, असे आरटीओ विभागाकडून  स्पष्ट करण्यात आले आहे.

              सदर कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात मोटार वाहन निदीक्षक दिपक काळे,  विलास ठेंगणे, अनुराग सालनकर, निखिल गायकवाड, सुरज मुन यांच्यामार्फत करण्यात आली.

Comments