वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*मुख्यमंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांनी केली तक्रार** *मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन*

*मुख्यमंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांनी केली तक्रार**
 *मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन*


वरोडा: शाम ठेंगडी

    वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज 20 फरवरी रोज गुरुवारला त्यांच्या विविध समस्याबाबत मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री यांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार वरोड्याचे तहसीलदार व पुलिस स्टेशन मध्ये  केली. आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील महिन्यात चंद्रपूर नागपूर महामार्ग रोखून धरण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
       मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री  यांनी निवडणुकीपूर्वी शेतकरी यांना प्रलोभन देऊन मते मागितली.तसेच डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना कमीत कमी एक महिना व जास्तीत जास्त सहा महिन्यापर्यंत विद्युत जोडणी करणे बंधनकारक असताना पाच ते सहा वर्ष लोटून सुद्धा विद्युत जोडणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीचे होत असून त्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री आणि जिल्हाचे पालकमंत्री यांच्या विरोधात वरोड्याचे  तहसीलदार  योगेश कौटकर यांच्याकडे निवेदन दिले. 
  ‌.    शेतकरी नेते  किशोर डुकरे यांच्या नेतृत्वामध्ये निवेदन देऊन त्वरित समस्या सोडविण्यात यावा अन्यथा येथील 10 मार्च ला नागपूर चंद्रपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्या जाईल. असा इशारा दिला असून याला जबाबदार प्रशासन राहील असे  त्यांनी सांगितले. 
    शेतकऱ्यांच्या मागण्याचे  निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात  अक्षय बोंदुलवार, विशाल देठे, श्रीकृष्ण देवतळे , माधव जीवतोडे, गोविंदा पाकमोडे, अंकित देठे, आकाश धवणे, सुनील चिडे, बालू आवारी, नितीन मोरे, प्रेमानंद सूर आधी शेतकऱ्यांचा समावेश होता.

Comments