वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*आरटीई अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू**Ø 27 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

*आरटीई अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू*

*Ø 27 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

चंद्रपूर, दि. 24 : सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार, दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसहाय्यीत शाळा, विना अनुदानित शाळा, पोलिस कल्याणकारी शाळा (विना अनुदानित) आणि महानगरपालिका शाळेमध्ये (स्वयंअर्थसहाय्यीत) आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.  प्रवेश प्रक्रियेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 185 पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे. नोंदणी पूर्ण झालेल्या 185 शाळांतील 1527 रिक्त जागांकरीता ऑनलाईन अर्ज 27 जानेवारी 2025 पर्यंत मागविण्यात येत आहे.

इयत्ता 1 ली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर 25 टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी. तसेच 25 टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता विचारपूर्वक 10 शाळांची निवड करावी. प्रवेश प्रक्रियेबाबत काही समस्या असल्यास आरटीई पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे. त्यावर संपर्क करून समस्येचे निराकरण करण्यात यावे.

पालकांनी ऑनलाईन अर्ज भरतांना घरचा पत्ता, जन्मदिनांक, उत्पन्नाचा दाखला, अपंगत्वाचा दाखला, जात प्रमाणपत्र आदी अचूक माहिती भरावी. ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई अतंर्गत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही. यापुर्वी प्रवेश मिळालेल्या बालकाची चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदर प्रवेश रद्द करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी कळविले आहे.

Comments