वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

चंद्रपूर जिल्ह्यातील बेपत्ता व्यापारी अरुणा काकडेचा सापडला मृत्यूदेह, गळा दाबून केले ठार, बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेश डाहूले याला अटक

चंद्रपूर जिल्ह्यातील बेपत्ता व्यापारी अरुणा काकडेचा सापडला मृत्यूदेह, गळा दाबून केले ठार, बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेश डाहूले याला अटक, 

26 नोव्हेंबरपासूनच्या बेपत्ता आणि खून प्रकरणाचा झाला उलगडा

अकूंश अवथे चंद्रपूर 

 मागील 15 दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील बेपत्ता असलेल्या व्यापारी महिलेचा मृतदेह नागपुरातील बेसा भागातील निर्जन स्थळी आढळला. या प्रकरणी चंद्रपूर पोलिसांनी बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेश डाहुले याला अटक केली आहे.
 देवांश जनरल स्टोर्स च्या संचालिका 37 वर्षीय अरुणा अभय काकडे या 26 नोव्हेंबर रोजी नागपुरातील इतवारी मार्केट मध्ये दुकानातील सामान खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हापासून त्या बेपत्ता होत्या. चिमूर पोलीस स्टेशनमध्ये याविषयी मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली. चिमूर पोलिसांना सिम रिचार्ज वरून आरोपीला शोधण्यात यश मिळाले. अरुणा चिमूर व्यापारी संघटनेच्या सदस्या असल्याने जिल्हा व्यापारी मंडळाने पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदन देत दबाव वाढविला होता. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा तपास चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार प्रभावती एकुरके यांच्याकडे सोपविला होता. पोलिसांना अखेर आरोपी गवसला. बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेश डाहूले याची पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली. 26 नोव्हेंबर रोजी अरुणा काकडेची आपली नागपुरात  भेट झाली होती. अरुणा ही माझी वर्गमैत्रिण होती. त्यामुळे आमची चांगली ओळख होती. आम्ही दिवसभर सोबत होतो, त्यानंतर रेशीमबाग मैदानावर आमच्या दोघात वाद झाला, मी यावेळी रागाच्या भरात अरुणाचा गळा आवळून खून केला व त्यानंतर आपल्या चारचाकी वाहनात अरुणा चा मृतदेह टाकत बेसा येथील निर्जन स्थळी असलेल्या घरातील शौचालयाच्या टाक्यात तिचा मृतदेह टाकला व पसार झाल्याची कबुली आरोपीने दिली. 2023 साली नरेश डाहूले हा स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होता. त्यावेळी शहरात अनेक घरफोडीच्या घटना घडल्या. त्या प्रकरणात मुख्य आरोपी नरेश डाहूले ला अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस विभागाने नरेश डाहूले ला बडतर्फ केले. चिमूर पोलिसांनी अरुणा प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Comments