वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या ३६ खातेदाराचे १ कोटी ७ लाख केले गहाळ**बँकेच्या अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हे दाखल**शाखा व्यवस्थापकाची भद्रावती पोलिसात तक्रार*

*विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या ३६ खातेदाराचे १ कोटी ७ लाख केले गहाळ*

*बँकेच्या अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हे दाखल*

*शाखा व्यवस्थापकाची भद्रावती पोलिसात तक्रार*

अतुल कोल्हे भद्रावती - 
              विदर्भ कोकण ग्रामिण बँक शाखा भद्रावतीच्या ३६ खातेदाराच्या खात्यातील रक्कम येथील कार्यरत अधिकाऱ्याने परस्पर आपल्या इतर खात्यात वळते करून खातेदाराची १ कोटी ७ लाख रक्कम गहाळ केल्याचा प्रकार घडला हा प्रकार येथील बँकेचे शाखा व्यवस्थापक यांच्या लक्षात येताच  त्यांनी या घटनेची तक्रार ३१ ऑक्टोबरला भद्रावती पोलिसात दाखल केली चौकशीनंतर यातील तीन आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे .
यातील रजत बाबुराव ईटनकर अधिकारी विदर्भ कोकण ग्रामीण बँक , सुरज कुमार साहू  राहणार नागपूर, प्रदीप दत्तात्रेय दूधभाते राहणार पुणे असे आरोपीचे नाव आहे. अमोल प्रकाशराव कठाळे शाखा व्यवस्थापक विदर्भ कोकण ग्रामीण बँक असे फिर्यादीचे नाव आहे. शाखा व्यवस्थापक अमोल यांचा १ सप्टेंबर रोजी अपघात झाल्याने ते दीड महिना गैरहजर होते. त्या काळात बँकेचे मुख्य अधिकारी म्हणून रजत ईटणकर यांना भद्रावती बँकेची जबाबदारी दिली होती. पार्वताबाई काकडे या खातेदाराच्या खात्यातून ३ लाख ५० हजार काढल्याची तक्रार बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राप्त झाली त्यानंतर या प्रकाराबाबत चौकशी केली असता रजत याने शेगाव ब्रांच मध्ये कार्यरत असताना तिथूनच गहाळ केले होते या घटनेची तक्रार शेगाव पोलीस स्टेशन येथे सुद्धा दाखल झाली आहे. बँकेचे  अधिकारी रजत ईटणकर यांच्यावर बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संशय आल्याने भद्रावती शाखेच्या इतर खातेदाराच्या खात्याची तपासणी केली असता ऑगस्ट २०२४ ते ऑक्टोबर २०२४ पर्यंत एकूण ३६ खातेदाराच्या खात्यातून १ कोटी ७ लाख गहाळ झाल्याचे उघडकीस आले व ही रक्कम रजत ईटणकर याने आपल्या बँकेचे अधिकारी असलेले दोन मित्र यांच्या संगनमताने आरटीजीएस ,नेफ्ट व रोख द्वारे गहाळ केले हा सर्व प्रकार लक्षात येतात बँकेच्या शाखा व्यवस्थापक यांनी भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली असता चौकशी नंतर यातील तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आह.

[या पद्धतीने केली खात्यातील रक्कम वळती ]
             बँकेतून ऑनलाइन किंवा रोख रक्कम एका खात्यातून दुसऱ्या खात्यात टाकायचे असेल तर एक अधिकारी एन्ट्री करणारा लागतो व दुसरा अधिकारी व्हेरिफाय करतो जोपर्यंत ही प्रोसिजर होत नाही तोपर्यंत एका खात्यातून दुसऱ्या खात्यात रक्कम जात नाही. रजत ईटनकर याला सुरत साहू व प्रदीप दूधभाते हे बँकेचे अधिकारी व्हेरिफाय करत असल्याने यांच्या संगनमतातून ही रक्कम गहाळ झाली.

[अमोल कठाळे शाखा व्यवस्थापक विदर्भ कोकण ग्रामीण बँक ] 
             विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या ३६ खातेदाराचे १ कोटी ७ लाख गहाळ झाल्याचा प्रकार घडला मात्र खातेदारांनी घाबरण्याचे कारण नाही काही खातेदाराची ठेवी जमा करण्यात आली आहे व बाकींची लवकरच जमा होणार आहे.
अमोल काचोरे ठाणेदार भद्रावती - खातेदाराचे १ कोटी ७ लाख गहाळ झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणी तीन व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Comments