वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*ग्रामीण रुग्णालयात पॅथॉलॉजी मशीन उपलब्ध करा**आपचे ग्रामीण रुग्णालय अधीक्षकांना निवेदन*

*ग्रामीण रुग्णालयात पॅथॉलॉजी मशीन उपलब्ध करा*

*आपचे ग्रामीण रुग्णालय अधीक्षकांना निवेदन*

अतुल कोल्हे भद्रावती :-
              भद्रावती शहरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या  रक्त तपासणीसाठी आवश्यक असणारी पॅथॉलॉजी मशीन उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांचा रक्त तपासणी अहवाल प्राप्त होण्यास चार ते पाच दिवसांचा दीर्घ कालावधी लागतो. या दिरंगाईमुळे रुग्णांचे योग्य रोगनिदान करता येत नसल्याने त्यांच्या आजारावर योग्य तो औषधोपचार करण्यास वेळ लागतो. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन शहरातील ग्रामीण रुग्णालयात पॅथॉलॉजी मशीन त्वरित उपलब्ध करून येथे येणाऱ्या रुग्णांना दिलासा द्यावा अशा मागणीची निवेदन भद्रावती येथील आम आदमी पक्षातर्फे ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांना सादर करण्यात आले. शहरातील ग्रामीण रुग्णालय हे तालुक्यातील महत्त्वाचे रुग्णालय असून या रुग्णालयात शहर तथा तालुक्यातील रुग्ण मोठ्या संख्येने आपल्या आजारावर उपचारासाठी येत असतात. मात्र पॅथॉलॉजी मशीन उपलब्ध नसल्याने त्यांना वेळेत योग्य तो उपचार मिळत नाही. सात दिवसांच्या  आत रुग्णालयात पॅथॉलॉजी मशीन उपलब्ध न केल्यास याविरोधात जनआंदोलन उभारण्याचा इशारा आप तर्फे सदर निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन सादर करताना आपचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments