वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामांकन दाखल नाही* *सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 216 अर्जांची उचल*

*चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामांकन दाखल नाही* 

*सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 216 अर्जांची उचल* 

चंद्रपूर, दि. 22 :  महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक  निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नामांकन दाखल करावयाच्या पहिल्या दिवशी आज (दि. 22) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकही नामांकन दाखल करण्यात आलेले नाही. तर इच्छुकांकडून 216 अर्जांची उचल करण्यात आली. 

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नामांकन दाखल करावयाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील 70-राजुरा विधानसभा मतदारसंघात 44 अर्ज, 71-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 31 अर्ज, 72-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 56 अर्ज, 73-ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 34 अर्ज, 74-चिमूर मतदारसंघात 24 अर्ज आणि 75-वरोरा विधानसभा मतदारसंघात 27 अर्ज असे एकुण सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 216 अर्जांची उचल करण्यात आली आहे. 
   महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. 22 ऑक्टोंबर रोजी निवडणूक अधिसूचना जारी झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोंबर असून, 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर पर्यंत आहे.
000000

Comments