वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*लाभत असलेल्या लोकसहभागातून यंदाचा महोत्सवसुद्धा अभूतपूर्व होणार - आ. किशोर जोरगेवार*

*लाभत असलेल्या लोकसहभागातून यंदाचा महोत्सवसुद्धा अभूतपूर्व होणार - आ. किशोर जोरगेवार*

*माता भक्त आणि विश्वस्तांची नियोजन बैठक संपन्न, 7 ऑक्टोबरपासून पाच दिवसीय महोत्सवाची सुरुवात*

अकूंश अवथे चंद्रपूर 

 यावर्षी 7 ऑक्टोबरपासून श्री माता महाकाली महोत्सवाला सुरुवात होणार आहे. याची तयारी आपण सुरू केली असून महोत्सवाची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. या महोत्सवात लाभत असलेल्या लोकसहभागातून यंदाचा महोत्सवही अभूतपूर्व होणार असल्याचा ठाम विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.

  7 ऑक्टोबरपासून चंद्रपूरात सुरू होणाऱ्या श्री माता महाकाली महोत्सव सिजन 3 च्या नियोजनासाठी महाकाली मंदिरात श्री महाकाली माता ट्रस्टच्या वतीने माता भक्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार जोरगेवार बोलत होते. या बैठकीला श्री महाकाली माता ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल महाकाले, सचिव अजय जयस्वाल, कोषाध्यक्ष पवन सराफ, विस्वत श्याम धोपटे, मधुसुदन रुंगठा, वंदना हातगावकर, डाॅ. अशोक वासलवार, राजु शास्त्रकार, डाॅ. जयश्री कापसे - गावंडे, मनिषा पडगीलवार, शैलेंद्र शुक्ला, गोपाल मंुदडा, दादाजी नंदनवार, पुरुषोत्तम राउत, इतर मान्यवरांची  प्रामुख्यतेने उपस्थिती होती.

  श्री माता महाकाली महोत्सव हा चंद्रपूरची ओळख बनला आहे. या महोत्सवामुळे चंद्रपूरच्या आराध्य दैवत माता महाकालीची महती देशपातळीवर पोहोचली आहे. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा महोत्सव दरवर्षी नवनवे विक्रम करत असून यंदा राज्यस्थानी रथात मातेच्या मूर्तीची नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. तसेच, पाच दिवस धर्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी चंद्रपूरकरांना अनुभवता येणार आहे. या पाच दिवसांत जागतिक दर्जाचे कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
  दरम्यान, सदर महोत्सवाच्या नियोजनासाठी महाकाली मंदिरात श्री महाकाली माता ट्रस्ट आणि महाकाली भक्त यांच्यात संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माता भक्तांनी दिलेल्या सूचना लक्षात घेण्यात आल्या. यातील आवश्यक सूचनांची दखल घेण्यात येणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. दरवर्षीप्रमाणे यंदाही या महोत्सवात 9,999 कन्यांचे कन्याभूजन व कन्याभोजन करण्यात येणार आहे. तसेच नवरात्री दरम्यान जन्मलेल्या कन्यांना श्री महाकाली माता ट्रस्टच्या वतीने चांदीचा शिक्का देण्यात येणार आहे. या भव्य आयोजनात चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीला माता भक्तांची शेकडोंच्या संख्येने उपस्थिती होती.

      वरोरा- भद्रावती विधानसभा प्रभावी नेतृत्व. 

Comments