वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*रामगिरी महाराज व आमदार नितेश राणेंवर कारवाई करा**मुस्लिम समाजातर्फे मूक मोर्चा काढून ठाणेदारांना निवेदन*

*रामगिरी महाराज व आमदार नितेश राणेंवर कारवाई करा*

*मुस्लिम समाजातर्फे मूक मोर्चा काढून ठाणेदारांना निवेदन*

अतुल कोल्हे भद्रावती :-
               समाजामध्ये आपल्या वक्तव्याने तेढ निर्माण करणाऱ्या रामगिरी महाराज व आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शहरातील मुस्लिम समाजातर्फे मूक मोर्चा काढून ठाणेदारांना  निवेदन सादर करण्यात आले. सदर मूक मोर्चा जामा मस्जिद चौकातून पोलीस स्टेशन पर्यंत काढण्यात आला. मुस्लिम समाजाच्या सहवासात राहणारे हिंदू सुरक्षित नसल्याचे विधान रामगिरी महाराज यांनी करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे इस्लाम धर्माचे संस्थापक यांचे विरोधात अपमान जनक वक्तव्य केले. रामगिरी महाराजांच्या या वक्तव्याचे समर्थन करीत आमदार नितेश राणे यांनी रामगिरी महाराजांवर कारवाई केल्यास मज्जिद मध्ये घुसून मारण्याची भाषा वापरली. त्यामुळे मुस्लिम समाजात आक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळे रामगिरी महाराज व आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर मूक मोर्चात शहरातील समस्त मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.

Comments