वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*लोकमान्य विद्यालयाचा व्हॉलीबॉल संघ विभागस्तरावर*

*लोकमान्य विद्यालयाचा व्हॉलीबॉल  संघ विभागस्तरावर*

अतुल कोल्हे भद्रावती :-
           नुकत्याच जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत येथील लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या १७ वर्षाखालील मुलांचा संघ विजयी ठरला असून तो आता गडचिरोली येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
     जिल्हास्तरीय सामन्यात प्रथम वरोरा त्यानंतर नागभीड व अंतिम सामन्यात कोरपणा तालुका संघाला पराभूत करीत भद्रावती येथील मागील वर्षी राज्यस्तरावर नेतृत्व करणाऱ्या लोकमान्य विद्यालयाच्या संघाने विजय मिळवीला. विजेत्या व्हॉलीबॉल संघामध्ये साहिल पिंपळकर, अथर्व रणदिवे, हर्षित कवाडे, सुजल जट्टलवार, सोहम खिरटकर, यश पिंपळकर, निशांत नगराळे, आदित्य रणदिवे, मोहित मारोटकर ,यश पाटील, अथर्व क्षीरसागर, अरमान अली या खेळाडूंचा सहभाग होता.
      विजयी संघाचे लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, प्राचार्य सचिन सरपटवार, उपप्राचार्य रूपचंद धारणे, पर्यवेक्षक प्रफुल वटे, क्रीडा विभाग प्रमुख विशाल गावंडे, रविंद्र नंदनवार, प्रतिक्षा खुजे, प्रतिक नारळे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी अभिनंदन केले व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक राजेश मत्ते, प्रफुल चटकी, प्रवीण झाडे, आदर्श आसुटकर यांना दिले आहे.

Comments