वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

गोंडवाना विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे विद्यार्थी झळकले

गोंडवाना विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे विद्यार्थी झळकले

अकूंश अवथे चंद्रपूर 

गोंडवाना  विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत सत्र २०२३  ते २०२४  मधील  झालेल्या विद्यापीठ परीक्षेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी, चंद्रपूर द्वारा संचालित डॉ आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चंद्रपूर येथील विविध विषयातील १० विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकले. या मध्ये दिमराव मोरेश्वर आभारे प्रथम मेरिट एम.ए., भुगोल, अविनाश एकनाथ रामटेके प्रथम मेरिट एम.ए., आंबेडकर विचाराधारा,  शेख मुस्कान आरीफ प्रथम मेरिट एम.एस्सी.इलेक्ट्रॉनिक्स, निखीलेश रमेश चामरे द्वितीय मेरिट एम.ए., आंबेडकर विचाराधारा,  नरेश राजेंद्र पिंपळशेंडे द्वितीय मेरिट एम.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स, कुंदन चंद्रभान दडमल तृतिय मेरिट एम.ए. इतिहास, राहुल केशवराव ठोंबरे तृतिय मेरिट एम.ए. राज्यशास्त्र, प्रियंका बामन पिंगे तृतिय मेरिट एम.ए. अर्थशास्त्र, समिर शंकर पिंपळकर तिसरा मेरिट एम.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स,  प्रेमलता मानसिंग केवट पाचवी मेरिट एम.कॉम., डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूर चे अध्यक्ष, श्री.अरूण जी. घोटेकर, उपाध्यक्ष, श्री. अशोक घोटेकर, सचिव, श्री. वामन मोडक, सहसचिव, श्री.कुणाल घोटेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थांना त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले.

Comments