वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वरोरा मध्ये जश्ने ईद-मिलादुन्नबीचा जलसा धूमधामात साजरा.

वरोरा मध्ये जश्ने ईद-मिलादुन्नबीचा जलसा धूमधामात साजरा

वरोरा शहर कमिटीच्या पुढाकाराने विश्वाला अमन व शांतीचे संदेश देणारे मोहम्मद पैगंबर यांची जयंती साजरी करण्यात आली.

वरोरा 
चेतन लुतडे 

वरोरा : जश्ने ईद-मिलादुन्नबी शहर कमिटीच्या वतीने 
संपूर्ण विश्वाला अमन व शांतीचे संदेश देणारे मोहम्मद पैगंबर यांची जयंती निमित्त शहरातील सर्व मुस्लीम समुदायच्या उपस्तिथित  मंगळवारी दि. १६/०९/२०२४ ला मोठ्या जल्लोषात जयंती मिरवणूक काढली. यात आकर्षक झांकी प्रमुख आकर्षण ठरल्या. विशेषत: लहान लहान मुलांनी जुलूसाची शोभा वाढवली. जुलूसला शहरभर विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले.
                  गणेश विसर्जन

मुस्लिम समाजाने शहरात पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जन्मदिनानिमित्त भव्य जुलूस काढला. मालवीय वॉर्ड, मौलाना आझाद वॉर्ड, कालरी वॉर्ड, कासम पंजा, काजी मोहल्ला परिसरातील लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील जहीरुद्दीन चिश्ती दरगाह परिसरात एकत्र आले. त्यानंतर येथून जुलूस सुरू होऊन सदभावना चौक, माढेली नाका, जयभारतीय चौक, डोंगरवार चौक, मित्र चौक, आझाद वॉर्ड, कालरी वॉर्ड, साप्ताहिक मंडी, नेहरू चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समारोप झाला. 
जुलूस दरम्यान शहरातील विविध राजकीय व सामाजीक संघटना आणि संस्थांनी तसेच लक्ष्मणरावजी गमे (राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुदेव सेवा मंडळ) व खासदार प्रतिभाताई धानोरकर वरोरा कॉंग्रेस कमेटी, मुकेश्भाऊ जीवतोडे शिवसेना जिल्हा प्रमुख, अनिलभाऊ धानोरकर माजी नगराध्यक्ष भद्रावती या सर्व मान्यवरांनी शाल पुष्प गुच्छ देऊन मौलाना व कमेटीच्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार करून सर्व नागरिकांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. सामाजिक संघटनांनी शरबत, मिठाई आणि लंगरची व्यवस्था केली होती.
त्यावेळी शांतता राखण्यासाठी पोलिस प्रशासनाचे पथक तैनात होते.
पोलिस प्रशासन आणि वरोरातील नागरिकांचे जश्न-ए-ईद-मिलाद-उन-नबी शहर कमिटीने धन्यवाद दिले, ज्यांनी या जुलूसाला यशस्वी बनवण्यासाठी मदत केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये जश्न-ए-ईद-मिलाद-उन-नबी शहर कमिटीचे  शब्बीर शेख, मोहसिन रजा पठान, जावेद हबीब, शेख, शकील खान, इमरान शेख, शाहरुख शेख, छोटू भाई, जावेद अंसारी, जावेद रजा, अनिस शेख, अयूब खान, मम्मू भाई बशीर भाई ( अन्ना ), नसीम कादरी, काजी मोहल्ला कमिटी, मौलाना आझाद वॉर्ड कमिटी, कासम पंजा कमिटी, कालरी वॉर्ड, मालवीय वॉर्ड कमिटी, कच्छी मस्जिद कमेटी सर्वांच्या सहकार्याने हजारो समाज बांधवांच्या सदर कार्यक्रम शांततेत पार पडला .

कमिटीचे पदाधिकारी :
शब्बीर शेख
मोहसिन रजा पठान
जावेद हबीब शेख
शकील खान
इमरान शेख
शाहरुख शेख
जावेद अंसारी
जावेद रजा
अयूब खान
शेख हमीद (मम्मू भाई)

या कार्यक्रमाचे आयोजन वरोरा मधील जश्ने ईद-मिलादुन्नबीचे वरोरा शहर कमिटीचे शब्बीर शेख
मोहसिन रजा पठान,जावेद हबीब शेख,शकील खान
,इमरान शेख,शाहरुख शेख,जावेद अंसारी,जावेद, रजाशेख हमीद (मम्मू भाई) यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

Comments