वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*वरोरा भद्रावती येथील गणेश विसर्जन मिरवणुकीला रात्री बारा पर्यंत वाद्य वाजविण्यास परवानगी द्या : किशोर टोंगे यांची पोलीस अधिकाऱ्यांकडे मागणी*

*वरोरा भद्रावती येथील गणेश विसर्जन मिरवणुकीला रात्री बारा पर्यंत वाद्य वाजविण्यास परवानगी द्या : किशोर टोंगे यांची पोलीस अधिकाऱ्यांकडे मागणी*

वरोरा/भद्रावती:
हिंदू समाजाच्या सण उत्सवाचे दिवस सुरु असून गणेशोत्सवात विविध मंडळाच्या माध्यमातून समाज प्रबोधनपर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मंडळाना गावातून व शहरातून मोठ्या प्रमाणात नागरिक दर्शनाला येत असून गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवसात रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यासह गणेश विसर्जन करण्यास मंडळाना परवानगी देण्यात यावी अशी मागणी भाजपा युवा नेते किशोर टोंगे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी नयामी साटम यांच्याकडे केली आहे.

अनेक कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन चालते मात्र हिंदूंच्या सण-उत्सवांना बडगा का असा प्रश्न किशोर टोंगे यांनी यावेळी विचारला. गणेश विसर्जनाच्या दिवशी मिरवणूकीत रात्री बारा पर्यंत वाद्य वाजवीण्याची परवानगी मिळावी अशी अनेक मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भावना असून त्याचा मान ठेवावा अशी भूमिका किशोर टोंगे यांनी मांडली.

प्रशासनाने दुटप्पी भूमिका ठेवत परवानगी नाकारली तर मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या रोशास पोलिसांना सामोरे जावे लागेल त्यामुळे पोलीस प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन कार्यकर्ताच्या भावना विचारात घ्यावात अशी चर्चा उपविभागीय पोलीस अधिकारी नयामी साटम मॅडम यांच्याशी झाल्याचे किशोर टोंगे यांनी सांगितले व हिंदू बांधवांच्या सणं समारंभात पोलीस प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

Comments