वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

पोलीस उपविभागीय अधिका-याकडे चोरीचा प्रयत्न!*

*पोलीस उपविभागीय अधिका-याकडे चोरीचा प्रयत्न!* 
वरोडा : श्याम ठेंगडी 

       येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्याकडे काल 23 सप्टेंबर रोज सोमवारला पहाटे अज्ञात चोरांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला.परंतु  चोरांचा हा प्रयत्न असफल ठरला.
      येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम या चार ते पाच दिवसापासून सुट्टीवर गेल्या आहेत. त्यामुळे संधी साधून चोरांनी अभ्यंकर वार्डातील त्यांच्या निवासस्थानी शिरून चोरी करण्याचा प्रयत्न  केला.त्यांच्या घरी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही चा डीव्हीआर तोडून नेल्याची माहिती आहे . त्यांच्या घरून इतर कोणत्याही प्रकारची चोरी झाली नसल्याचे वृत्त आहे.
       काल सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साठम या गाऊन परत आल्या असता त्यांना झालेला प्रकार लक्षात आला व त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली.
            वरोडा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच  पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचे गांभीर्य पाहता पंचनामा करून अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
       पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनात वरोडा पोलीस घटनेची चौकशी करीत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या घरी चोरांनी चोरी करण्याचे धाडस केल्याने खळबळ माजली आहे.

Comments