वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

भद्रावतीत उद्या शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाची वरोरा विधानसभा आढावा सभा*

*भद्रावतीत उद्या  शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाची  वरोरा विधानसभा  आढावा सभा*

*मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरीताई पेंडणेकर, महिला आघाडीच्या उपनेत्या विशाखाताई राऊत यांच्यासह मान्यवर महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती*
चंद्रपूर (भद्रावती) :
दि. १९ सप्टेंबर २०२४ रोज गुरुवारला सकाळी ११ वाजता भद्रावती येथील श्री मंगल कार्यालयात शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य साहेब  ठाकरे, शिवसेनेचे जेष्ठ नेते भास्कर जाधव साहेब यांच्या आदेशान्वये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची  वरोरा-भद्रावती विधानसभा आढावा सभा आयोजित करण्यात आलेली आहे.
या सभेत प्रमुख मार्गदर्शिका म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरीताई पेंडणेकर, राज्य महिला आघाडीच्या उपनेत्या विशाखाताई राऊत, चंद्रपूर जिल्हा संपर्क संघटिका सुषमाताई साबळे,  संपर्क संघटिका सोनालीताई म्हात्रे, पक्ष निरीक्षक शालिनीताई सावंत आणि निधीताई शिंदे, नागपूर जिल्हा संपर्क संघटिका मंदाकिनीताई भावे आणि पुर्व विदर्भ युवा सेना सचिव तथा सिनेट सदस्य गोडवाना विद्यापीठ गडचिरोली प्रा. निलेश बेलखेडे उपस्थित राहतील. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे (वरोरा व राजुरा विधानसभा क्षेत्र) यांची प्रमुख उपस्थिती राहतील.
सदर आढावा सभेला ७५-वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील समस्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुरुष व महिला आघाडी आणि युवा सेनेचे समस्त शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते बंधू भगिनींनी फार मोठ्या संखेत उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे संयुक्त आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे (वरोरा व राजुरा विधानसभा क्षेत्र), महिला आघाडीच्या चंद्रपूर जिल्हा संघटिका नर्मदाताई बोरेकर, उप-जिल्हा संघटीका मायाताई नारळे, भद्रावती तालुका संघटिका आशाताई ताजने, वरोरा तालुका संघटिका सरलाताई मालोकर, भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती अश्लेषा जीवतोडे भोयर, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका कल्पनाताई टोंगे, भद्रावती शहर सघंटीका मायाताई टेकाम, वरोरा शहर सघंटीका शुभांगी अहीरकर, भद्रावती शहर समन्वयक भावनाताई खोब्रागडे, वर्षाताई ठाकरे व प्रा. प्रिती पोहाने तसेच चंद्रपूर जिल्हा महिला आघाडी यांनी केले आहे.

Comments