वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

चला बदल घडवुया उपक्रमा अंर्तगत तान्हा पोळा संपन्न.*वरोरा भद्रावती विधानसभेत बदल घडवूया.

*चला बदल घडवुया उपक्रमा अंर्तगत तान्हा पोळा संपन्न.*

वरोरा भद्रावती विधानसभेत बदल आल्याशिवाय प्रगती होणार नाही.
डॉक्टर चेतन खूटेमाटे 

वरोरा
चेतन लुतडे 

वरोरा तालुक्यातील बांद्रा,मोहबाळा,चारगांव(बु),मालविय वार्ड,अंबादेवी वार्ड,द्वारकानगरी बोर्डा येथे डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या चला बदल घडवूया या संकल्पनेतुन नोटबुक वाटप करण्यात आले. तसेच बांद्रा येथे कै.संजय हक्के यांच्या स्मृर्ती प्रित्यर्थ हनुमान सांस्कृतीक क्रिडा मंडळ बांद्रा, यांच्या सौजन्याने नंदी बैल सजावट स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धे मध्ये एकुण २१ बक्षिसांचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष  डाॅ.चेतन खुटेमाटे यांनी  राजकारणात बदल झाल्याशिवाय विधानसभेत प्रगती होणार नाही. असे स्पष्ट वक्तव्य यावेळी केले. 
प्रमुख अतिथी म्हणुन सरपंच बोरगाव (दे)जयाताई चिंचोलकर,अविनाश चिंचोलकर पोलीस पाटील,डाॅ.हिवरे पशु वैद्यकीय अधिकारी,रोशन दडमल उपसरपंच,शंकर काळमेंघे,अध्यक्ष हनुमान सांस्कृतीक क्रिडा मंडळ बांद्रा,सतिश परचाके,चंद्रशेखर झाडे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन कु.आचल दडमल आभार प्रदर्शन वैभव चिंचोलकर यांनी केले.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी भाष्कर मगरे,सागर दोहतळे,अक्षय राणे,वैभव कुबडे,सुमित कुबडे,उमेश मगरे,सतिश हक्के,विंटेश हक्के,भाविक गोरघाटे,संतोष दडमल,राहुल दडमल,विशाल सोनेकर,जगदिश चिंचोलकर,स्वप्निल टाले,संकेत गोहोकर,तुषार कडू,विशाल मोरे,मनोज गाठले,प्रफुल सोनेकर यांनी अथक प्रयत्न केले.

Comments