वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*तक्रार निवारण समितीकरीता सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रस्ताव आमंत्रित*

*तक्रार निवारण समितीकरीता सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रस्ताव आमंत्रित*

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर, दि. 6 : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिक  छळापासून संरक्षण (प्रतिबंध,मनाई आणि निवारण ) अधिनियम, 2013 नुसार चंद्रपूर जिल्ह्याकरीता स्थानिक तक्रार निवारण समिती गठित करावयाची आहे. त्यासाठी खालील अहर्ता प्राप्त सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे.


अध्यक्ष पदासाठी सामाजिक कार्याचा 5 वर्षाचा अनुभव असलेल्या आणि महिलांच्या सोयीसाठी बांधिल असलेल्या महिलांमधून नामनिर्देशिनाने अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येईल. तर दोन सदस्य पदासाठी  महिलांच्या सोयीसाठी बांधिल असलेल्या अशासकीय संघटना/ संघ किंवा लैगिक छळाच्या प्रश्नांशी परिचीत असलेल्या व्यक्ती मधून दोन सदस्य नामनिर्देशित करण्यात येईल व त्यापैकी किमान एक महिला राहील.

परंतु, त्यापैकी किमान एक नामनिर्देशित सदस्याची पाश्वभूमी प्राधान्याने कायद्याची असावी. तसेच त्यापैकी किमान एक नामनिर्देशित सदस्य अनुसुचित  जाती, अनुसुचित जमाती किंवा इतर मागासवर्ग अल्पसंख्यांक समाजातील महिला असावी. उपरोक्त अर्हताधारक  सामाजिक कार्यकर्त्यांनी परीपूर्ण प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जुना कलेक्टर बंगला, आकाशवाणीच्या मागे, साईबाबा वार्ड, चंद्रपूर या कार्यालयात 20 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करावा, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

०००००

Comments