वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*जिल्हाधिका-यांच्या पुढाकाराने श्रमदानातून स्वच्छता उपक्रम* *अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश*


*जिल्हाधिका-यांच्या पुढाकाराने श्रमदानातून स्वच्छता उपक्रम*
 *अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश*

अकूंश अवथे चंद्रपूर 

 चंद्रपूर, दि. 21 : ‘सुंदर माझा परिसर, सुंदर माझे कार्यालय’ या संकल्पनेवर आधारीत तसेच जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या पुढाकाराने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात श्रमदानातून स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. या मोहिमेमध्ये अधिकारी आणि कर्मचा-यांनी सहभाग घेऊन संपूर्ण परिसर स्वच्छ केला. 
जिल्हाधिकारी कार्यालय तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय, व तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनात श्रमदानाव्दारे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी सुंदर माझे कार्यालय अभियानाच्या अनुषंगाने स्वच्छता व आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, आपल्या कार्यालयाचा परिसर तसेच आपल्या कार्यालयातील बैठक व्यवस्थेच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवावी, जेणेकरून आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल. स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी सर्व अधिकारी / कर्मचा-यांनी केलेल्या कामावर त्यांनी समाधान व्यक्त केले.
सदर मोहिमेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) दगडू कुंभार,  उपजिल्हाधिकारी (रोहयो) शुभम दांडेकर, चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, तहसीलदार (संगायो) सीमा गजभिये, तहसीलदार (सामान्य) प्रिया कवळे, अधीक्षक पल्लवी आखरे, नायब तहसीलदार राजू धांडे, जितेंद्र गादेवार, गिता उत्तरवार, ज्योती कुचनकर, कनिष्ठ अभियंता श्री. भट्टड यांच्यासह सहायक करमणूक कर अधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, चंद्रपूर येथील सर्व कर्मचारी, चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक आदी उपस्थित होते.
०००००००

Comments