वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*स्वावलंबी बनवून शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा - आ. किशोर जोरगेवार*

*स्वावलंबी बनवून शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा  - आ. किशोर जोरगेवार*

*महिला व बालविकास विभागाच्या वतीने महिला मार्गदर्शन मेळावा  संपन्न झाला.*

अकूंश अवथे चंद्रपूर 
 
शासन महिलांसाठी विविध योजना राबवित आहे. यापैकी लाडकी बहीण योजने माध्यमातून राज्यभरातील लाखो महिलांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. शासनाच्या अनेक योजना कार्यान्वित असल्या तरी त्या सर्व महिलांपर्यंत पोहोचत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आजच्या मार्गदर्शन शिबिरातून स्वावलंबी बनवून, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
  महिला व बालविकास विभाग यांच्या वतीने चांदा क्लब मैदान येथे विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी महिला मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य मंत्री,  वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपिन पालिवाल, परिवीसाधीन अधिकारी कश्मीरा संके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नूतन पारधी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश खवले, नगर प्रशासन अधिकारी गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी दीपक बनाईक, यंग चांदा ब्रिगेडच्या अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन आदी मान्यवर उपस्थित होते.
  यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, "महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकार नेहमी पुढाकार घेत आहे. विशेषतः महिलांसाठी विविध योजना सरकारच्या वतीने राबवल्या जात आहेत. महिलांना स्वयंरोजगारातून आर्थिक सक्षम होता यावे यासाठीही शासनाच्या योजना आहेत. मात्र, त्यांच्या योग्य अंमलबजावणीचा अभाव आहे, हे सत्य नाकारता येत नाही." ते पुढे म्हणाले की, "या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे मुख्य काम स्थानिक प्रशासनाचे आहे. त्यांनी यंत्रणा आणखी सक्षम करून लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्याचे सूक्ष्म नियोजन करावे."
 आपल्या कुटुंबाचे, आणि विशेषतः मुलींच्या भविष्यासाठी शासनाच्या योजना अत्यंत उपयुक्त आहेत. या योजनांद्वारे मुलींच्या शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनांचा उद्देश केवळ आर्थिक मदतच नाही, तर महिलांना त्यांच्या अधिकारांसाठी जागरूक बनविणे आणि समाजात सन्मानाने जगण्याची संधी प्रदान करणे आहे, असे आ. जोरगेवार यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Comments