1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

शेतकरी नेते , जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी गणेश मंदिरातील पोळा शेतकऱ्यांसोबत साजरा केला.


शेतकरी नेते , जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी गणेश मंदिरातील पोळा शेतकऱ्यांसोबत साजरा केला.

फक्त बातमी 
चेतन लुतडे 

 मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आदेशाने व माननीय किरण भाऊ पांडव पूर्व विदर्भ समन्वयक यांचे मार्गदर्शनात तसेच किशोरजी राय संपर्कप्रमुख चंद्रपूर जिल्हा यांचे सूचनेनुसार आज बैलपोळ्या निमित्त श्री नितीन मत्ते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांनी गौराळा येथील गणेश मंदिरा मधील पोळा उत्सवात सहभाग घेऊन बैल जोडी मालकांना एक छोटीशी भेट म्हणून टिफिन डब्बा गिफ्ट केला व सर्व बैल जोडी मालकांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सदैव आपल्या पाठीशी उभे आहे अशी ग्वाही देऊन शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले .
सर्व शेतकरी बांधवांनी नितीन भाऊ यांचे अभिनंदन करून त्यांना पण बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन धोरण आखले असून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस येणार असल्याचे मत यावेळ व्यक्त केले.
युवा प्रशिक्षण योजना, लाडका भाऊ योजना, वयोवृद्ध योजना, अशा अनेक योजना मार्फत सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नक्की दिलासा देणार अशी हमी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मध्ये यांच्यासह  आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख चंद्रपूर, श्री मनीष बुच्चे उपशहर प्रमुख भद्रावती, श्री प्रथम गेडाम शाखाप्रमुख गवराळा, श्री राकेश बदखल, प्रतीक वरखडे, श्रीनिवास जीवतोडे, निलेश टोंगे, सुरज ढवळे, रोशन बदखल, अक्षय आस्कर, राज बदखल, ओमकार बदखल व सर्व शिवसैनिक, सर्व बैलजोडी मालक, तसेच सर्व गौराळा येथिल नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments