1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

समाजकारण हाच वसा , हाच वारसा...शिवसेनेची रुग्णसेवा अविरत सुरूच राहणार. जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे.

समाजकारण हाच वसा , हाच वारसा...
शिवसेनेची रुग्णसेवा अविरत सुरूच राहणार. जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे.

वरोरा 
चेतन लुतडे 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख, रवींद्र शिंदे यांचेसह पक्षाचे पदअधिकारी व शिवसैनिक सतत गरीब, गरजू लोकांच्या मदतीला धावून जात असतात. शिवसेनाप्रमुख  हिन्दुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे  80% समाजकारण व 20% राजकारण यांच्या आदर्श मूल्यावर सतत कार्य  सुरु आहे. 
बालाजी देवगण पुरटकर रा. दहेली (लावरी) ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर यांची आई गीताबाई देवगण पुरटकर यांचा हात अपघातात मोडला होता त्यावर उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे शस्त्रक्रिया करण्यात आली.  यादरम्यान शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय “ शिवालय” येथुन त्यांना सतत मदत करण्यात आली. दि.१२/०८/२०२४ ला त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यांना सुट्टी होतात त्यांनी प्रथम शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे  कार्यलय “शिवालय” येथे येवुन प्रथम शिवालयातील आई तुळजा भवानी चे दर्शन घेतले व हिंदवी स्वराज्याचे सस्थांपक छत्रपती शिवाजी महाराज  यांना मानवदना करुन शिवसेनाप्रमुख  वंदनिय हिन्दुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन  करुन सर्वाचे आभार मानले.
        “शिवालय” कडुन त्यांना त्याचे दहेली (लावरी) ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर या गावी जाण्याकरिता वरोरा येथील शिवसेना पक्षाचे वाहन *शिवालाय* त्याना जाण्याकरिता उपस्ब्ध करुन देण्यात आले.यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख, रवींद्र शिंदे यांनी भविष्यात आरोग्य विषयी कोणतीही गरज भासल्यास मदत करण्याचे आश्वासन सुध्दा जिले.शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे  कार्यलय “शिवालय” येथुन झालेल्या मदतीने त्या भारावून गेल्या व त्यांनी शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे  पक्षा  तर्फे केलेल्या सहकार्यामुळे माझ्यात व माझ्या परिवारामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. त्यामुळे मी लवकरच उपाचरावर मात करु शकले अशी मत व्यक्त करीत शिवसेना कार्यातील सर्व पदअधिकारी व व्यवस्थापन कर्मचारी यांना भविष्यात असेच कार्य करीत रहा अश्या शुभेच्छा दिल्या.

Comments