वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

चिकणी परिसरातील हजारो नागरिकांचे डोळे तपासणी व चष्मे वाटप कार्यक्रम.

चिकणी परिसरातील हजारो नागरिकांचे डोळे तपासणी व चष्मे वाटप कार्यक्रम.

गावातील गरीब लोकांनी नेत्रतज्ञ डॉक्टर चेतन खूटेमाटे यांना दिले आशीर्वाद.

वरोरा 
चेतन लुतडे 

वरोरा भद्रावती मतदारसंघात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नेत्रतज्ञ डॉक्टर चेतन खूटेमाटे यांना गरीब लोकांचे आशीर्वाद लाभत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून गरजू व गरीब जनतेमध्ये जाऊन डोळ्या संबंधित आजारावर प्रभावी काम करीत आहे. शेकडो कॅम्प स्वतःच्या खर्चातून राबवून जनतेचे आशीर्वाद ते जमा करत आहे. त्यामुळेच फार कमी वेळात डॉक्टर खुटेमाटे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत शिक्षित उमेदवार म्हणून आपला ठसा उमटवलेला आहे. विधानसभेच्या सर्वे मधील सामाजिक कामात प्रथम क्रमांक खूटेमाटे यांचा लागला असून राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढतील असा अंदाज जनतेतर्फे बांधला जात आहे.
चला बदल घड़वुया या मोहिमे अंतर्गत वरोरा भद्रावती मतदरसंघात डोळे तपासणी, आरोग्य तपासनी शिबिरे , मॅरेथाॅन स्पर्धा , व्यवसाय मार्गदर्शन , प्रेरणेतुन प्रगति , असे विविध सकारात्मक व समाज उपयोगी उपक्रम जोमाने राबविण्यात यश आले आहे.  या मोहिमे अंतर्गत डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतु चिकणी येथे दिनांक २९  सप्टेंबर २०२४ ला मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले.या शिबीराला चिकणी, बोपापूर, खापरी, टाकळी, डोंगरगाव, शेगाव, खरवड, गौळ, नागरी, केळी, महाडोळी, वाघनख,या गावातील १०१२  नागरीकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला व डोळे तपासणी करुन घेतली.
या कार्यक्रमाचे उदघाटन मा.सुरेश माथनकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.चेतन खुटेमाटे, प्रमुख पाहुणे म्हणून जर्नादन देठे,किशोर झाडे,संगिता खारकर,आनंदराव दातारकर, पंढरी बुचूंडे, नरेंद्र माथनकर, पंढरी देहारकर, सुनिल येळेकर, नथ्थुजी गावंडे,मेघश्याम बोधे,रामभाऊ येडेकर,खिरटकर महाराज,गजानन येळेकर,सुरेश साळवे,प्रणिल खंगार हे मान्यवर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक सुधाकर खरवडे, संचालन चंद्रशेखर झाडे,आभार प्रदर्शन संदिप सोनेकर यांनी केले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गुरुदृष्टी नेत्रालय ची सर्व टिम प्रविन वासेकर,विजय झाडे,विठ्ठल भेदुरकर,मारोती जवादे,विलास घाईत,ताराचंद बोरेकर,मारोती कुत्तरमारे,सुनिल डोंगरे,रंजना भुसारी,अनुप खुटेमाटे,सचिन खुटेमाटे,महेश आस्कर  यांनी अथक प्रयत्न केले.


Comments