वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*काव्यपठन स्पर्धेत फेरीलैंड कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी समीक्षा वानखेडे नागपूर विभागातून प्रथम*

*काव्यपठन स्पर्धेत फेरीलैंड  कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी समीक्षा वानखेडे नागपूर विभागातून प्रथम*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                   कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघ महाराष्ट्र राज्याच्या नागपूर विभागातर्फे नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पल्लवन तथा काव्यपठण स्पर्धेत भद्रावती शहरातील फेरीलँड कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीची विद्यार्थिनी समीक्षा वानखेडे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. सदर स्पर्धेत महाविद्यालयाच्या 27 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. याशिवाय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केल्याबद्दल महाविद्यालयातील हिंदीच्या प्राध्यापिका कविता पाझारे यांना नागपूर येथे मुंबई येथील हिंदी सुप्रसिध्द साहित्यकार डॉक्टर दयानंद तिवारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत यश प्राप्त केल्याबद्दल या सर्वांचा महाविद्यालयात महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी फेरीलैंड  कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालक अड. युवराज धानोरकर, प्राचार्या  वर्षा धानोरकर, उपप्राचार्या अर्चना धोटे, अधिक्षिका कुमुद पोइनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments