वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*घोडपेठ येथे काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चैनीथैला व महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भव्य जंगी स्वागत*

*घोडपेठ येथे काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चैनीथैला व महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भव्य जंगी स्वागत* 

अतुल कोल्हे भद्रावती :-
                काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी  रमेश चैनीथैला व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आढावा बैठकीला जात असताना घोडपेट येथे पुष्पगुच्छ देऊन व फटाक्याच्या आतिश बाजीने व ढोल ताशाच्या गजरात भव्य जंगी स्वागत करण्यात आले 
 यावेळी भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, दिनेश पाटील चोखारे, घोडपेठ सरपंच अनिलखडके, अशोक येरगुडे, ईश्वर निखाडे, मुन्ना रायपुरे, ग्रामपंचायत सदस्य  ज्योती मोरे, कविता शेळके ज्योती खडके, विनोद मूटपल्लीवार,सुनील   खडके अनिता देवगडे, नलू मडावी कांता बोबडे, आदीसह बहुसंख्याक नागरिक उपस्थित होते

voice of media नवीन महाराष्ट्र कार्यकारणीचे हार्दिक अभिनंदन. 

Comments