वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

मतदान बूथ केंद्र वाढवण्याची मागणी: दिनेश चोखारे लांबच लांब रांगामुळे होऊ शकतो मतदानावर परिणाम

मतदान बूथ केंद्र वाढवण्याची मागणी: दिनेश चोखारे 
लांबच लांब रांगामुळे होऊ शकतो मतदानावर परिणाम 
 
चंद्रपूर :- 
मागील लोकसभेच्या निवडणुकीत मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्याने मतदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विधानसभा 2024च्या निवडणुकांमध्ये या समस्यांना सामोरे जाण्यासाठीजिल्हा कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मजी सभापती दिनेश दादापाटील चोखारे यांनी मतदानाचे बूथ केंद्र वाढवण्याची मागणी केली आहे.

चोखारे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, मागील निवडणुकीत अनेक बूथ केंद्रावर वर रात्री 8 वाजेपर्यंत मतदान सुरू ठेवावे लागले. त्यामुळे मतदारांना मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात खूप अडचणी आल्या. या कारणांमुळे मतदानाच्या सरासरीवर परिणाम होतो, ज्यामुळे लोकांचा सहभाग कमी होतो. 

रांगेत वाट पाहण्यात घालवलेला वेळ कमी करण्यासाठी बूथ केंद्र वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, यामुळे मतदारांना सोयीचा अनुभव मिळेल आणि लोकतंत्रातील त्यांच्या सहभागाला चालना मिळेल. 


मतदान प्रक्रिया अधिक सुकर करण्यासाठी मतदानाचे बूथ केंद्र वाढवण्याची आवश्यकता आहे. हे फक्त मतदारांच्या सोईसाठी नाही, तर लोकशाही प्रक्रियेत सर्वांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे.

Comments