वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*नगरपरिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष*भद्रावती शहरात डेंगू चा कहर

*नगरपरिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष*
भद्रावती शहरात डेंगू चा कहर

अतुल कोल्हे भद्रावती :- 
            सततच्या पावसाने शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली आहे. त्यात डेंगूच्या डासाचे प्रमाण वाढल्याने शहरात डेंगूच्या आजाराने थैमान घातले आहे. 

शहरातील खासगी , शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्णू उपचार घेत आहेत. याकडे नगरपरिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे.दोन जण दगावल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील दरबाण सोसायटी , संताजी नगर , गौतम नगर, श्रीराम नगर , आयुध निर्माणी वसाहत या भागात डेंगूच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय आसुटकर यांना विचारणा केली असता शहरी भागात जुलै ऑगस्ट या दोन महिन्यात दहा रुग्ण आढळल्याचे सांगितले ही आकडेवारी आमची असून खाजगी रुग्णालयातील आकडेवारी आमच्याकडे उपलब्ध नसते ते म्हणाले  तसेच ग्रामीण भागात चंदनखेडा , कचराळा ,चेकबरांज , मांगली , जेना , सोनेगाव , कुसना येथे 16 रुग्ण आढळले उपायोजना म्हणून आमच्याकडून गप्पी मासे ' फवारणी जनजागृती अशा प्रकारची उपाययोजना करण्यात येत आहे.पावसानंतर डासाचे प्रमाण कमी होऊन हा आजार आपोआप कमी होईल असे डॉ. आसुटकर यांनी सांगितले.
डॉ. राहुल साळवे प्रसिद्ध बालरोग तज्ञ - यांना विचारणा केली असता आतापर्यंत माझ्या रुग्णालयात ऑगस्टमध्ये ४० तर 3 सप्टेंबर पर्यंत १० रुग्ण उपचार घेत असल्याचे शहरातील अन्य खाजगी रुग्णालयात हाच प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले. 

कॉम्रेड राजू गैणवार जिल्हा सहसचिव भाकपा -  डेंगूचे प्रमाणात वाढ होण्यास नगरपरिषद जबाबदार आहे. ते म्हणाले जेव्हापासून नगरपरिषदेवर प्रशासक बसले आहे  तेव्हापासून शहराच्या स्वच्छते सोबतच इतर गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे शहरात डेंगू सत इतर आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे .

Comments