वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

आमदार नितेश राणे वर गुन्हा दाखल करा**अल्पसंख्यांक चंद्रपूर शहर राष्ट्रवादी चे पोलीस अधीक्षक ह्यांना निवेदन*

*आमदार नितेश राणे वर गुन्हा दाखल करा*

*अल्पसंख्यांक चंद्रपूर शहर राष्ट्रवादी चे पोलीस अधीक्षक ह्यांना निवेदन*

अतुल कोल्हे भद्रावती :-
           भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे हे नेहमी मुस्लिम समुदायवर काहि न काहि अनुचित विधान करीत असतात.
असेच अहमदनगर येथील एका कार्यक्रमात आपल्या भाषणात मुस्लिम समुदया बद्दल अनुचित विधान केले ह्या विधाना बद्दल मुस्लिम समुदायात असंतोष पसरला आहें. असे विधान केल्या बद्दल समाजात असोंतोष पसरू शकते.
ह्या करिता राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टि ( शरद पवार ) प्रदेश सरचिटनीस मुनाज शेख यांच्या उपस्थीतीत चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अल्पसंख्यांक शहर जिल्हा अध्यक्ष बब्बू अहेमद इसा ह्यांच्या  नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब ह्यांना निवेदन देण्यात आले. 
            यावेळी आमदार नितेश राणे ह्यांच्या वर गुन्हा दाखल करावे या संदर्भात चर्चा करण्यात आली.
निवेदन देते वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अल्पसंख्यांक पक्षाचे इजाज भाई रिझवी, महासचिव मोहन सिंग ठाकूर जलील भाई, अजीम भाई, चांद भाई, बबलू भाई, विश्वास खैरे, जावेद भाई तसेच असंख्य पदाधिकारी उपस्थित होते

Comments