वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

किशोर डुकरे यांच्या 39 व्या वाढदिवसा निमित्त आणि भोलेनाथ गणेश मंडळ 75 व्या अमृत महोत्सवी रक्तदान शिबिर

किशोर डुकरे यांच्या 39 व्या वाढदिवसा निमित्त आणि भोलेनाथ गणेश मंडळ 75 व्या अमृत महोत्सवी रक्तदान शिबिर 

वरोरा,
 तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते शेतकरी नेते यांचा काल 39 वा वाढदिवस रक्तदान शिबीर ने साजरा करण्यात आला,
 यावेळी भटाळा येथील भोलेनाथ गणेश मंडळ आयोजित 75 व्या अमृत महोत्सवी भोलेनाथ गणेश मंडळ भटाळा यांच्यामार्फत 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले, तसेच आसाळ येथील त्रिमूर्ती गणेश मंडळ यांच्या 33 व्या स्थापना वर्षी त्रिमूर्ती गणेश मंडळ आयोजित श्री किशोर भाऊ डुकरे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले, नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे किशोर डुकरे हे आपल्या नेत्याचे आणि स्वतःचा जन्मदिवस हा सामाजिक उपक्रम राबवून करतात, काल झालेल्या भटाळा आणि आसाळा येथील रक्तदान शिबिर मध्ये अनुक्रमे 50तर 40 असे दोन्ही रक्तदान शिबिरात 90 रक्तदात्यांनी रक्तदान केले, यावेळी आसाळा येथील रक्तदात्यांना ट्रॅक सूट चे वाटप करण्यात आले.

Comments