वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

नागपूर-हैदराबाद ‘वंदे भारत’ ट्रेन 16 सप्टेंबरपासून सुरू

*नागपूर-हैदराबाद ‘वंदे भारत’ ट्रेन 16 सप्टेंबरपासून सुरू*

*Ø पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाली रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी*

*Ø चंद्रपूर- बल्लारशाह रेल्वे स्थानकावर होणार भव्य स्वागत*

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर,दि.13 : नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसची मागणी आणि त्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे मंत्री आश्विनीकुमार वैष्णव यांना प्रत्यक्ष भेटत दोन वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. सोमवारी 16 सप्टेंबर रोजी चंद्रपूर येथे सायंकाळी 6.20 वाजता आणि बल्लारशाह रेल्वे स्थानकावर सायंकाळी 6.40 वाजता नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.

मुंबई-अहमदाबाद प्रमाणे नागपूर ते हैदराबाद करिता वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याबाबत वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 7 डिसेंबर 2022 रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना पत्राद्वारे मागणी केली होती. नागपूर ते हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्यास नागपूरसह विदर्भातील सर्वसामान्यांसह विद्यार्थी, रुग्ण, व्यापारी, नागरिक या सर्वांना मोठा लाभ होणार असल्याचेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले होते. पत्र व्यवहारानंतर या मागणीसंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. श्री. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून नागपूर ते हैदराबाद वंदे भारत एक्सक्प्रेसला मंजुरी प्रदान करण्यात आली.

रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाचे विदर्भातील जनतेकडून स्वागत करण्यात येत आहे. सोमवारी 16 सप्टेंबर रोजी चंद्रपूर येथे सायंकाळी 6.20 वाजता आणि बल्लारपूर येथील जनतेकडून सायंकाळी 6.40 वाजता नागपूर ते हैदराबाद वंदे भारत एक्सक्प्रेसचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जाहीर आभार देखील मानण्यात येईल, अशी माहिती झेडआरयूसीसी मध्य रेल्वे झोन मुंबईचे सदस्य, एनआरयूसीसी रेल्वे मंत्रालय नवी दिल्लीचे सदस्य अजय दुबे यांनी दिली आहे.

*एकूण पाच थांबे, त्यातील दोन चंद्रपूर जिल्ह्यात :* अतिजलद अत्याधुनिक व आरामदायक वंदे भारत एक्सप्रेस ही 20 डब्यांची राहणार आहे. नागपूर ते सिकंदराबाद (हैदराबाद) हे 578 किलोमीटर अंतर ताशी 130 किमी वेगाने पार करेल. नागपूर ते सिकंदराबाद (हैदराबाद) वंदे भारत एक्सप्रेसला एकूण पाच थांबे देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील दोन थांबे चंद्रपूर जिल्ह्यातच देण्यात आले आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष पुढाकाराने चंद्रपूर जिल्हावासीयांना ही भेट मिळाली आहे. वंदे भारत एक्सप्रेस नागपूर येथून सुटल्यानंतर सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारपूर, रामगुडंम, काजीपेठ येथील प्रवाशांना घेऊन सिकंदराबाद येथे पोहोचणार आहे.

००००००

Comments