वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या संवाद बैठका*

*विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या संवाद बैठका*

*4 आक्टोबर ला गडचिरोलीपासून सुरू होऊन 9 आक्टोबरला नागपुरात संवाद बैठकीचा समारोप*

अतुल कोल्हे भद्रावतो :-
                केंद्र व राज्य शासनाने गेल्या वर्षभरापासून घेतलेल्या निर्णयांची माहिती देणे. 24 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सरकारने क्रिमी लेयरबाबत घेतलेल्या निर्णयाबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये 4 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीत संवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे म्हणाले की, सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती अजूनही समाजापर्यंत पोहोचलेली नाही. ही माहिती संवाद सभेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल.24 सप्टेंबर रोजी क्रिमी लेयरची मर्यादा 8 लाख रुपयांपर्यंत वाढवल्याने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्याबद्दल त्यांचे आभारही मानले जातील.संवाद सभा  गडचिरोली जिल्ह्यातून ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून या यात्रेचे नेतृत्व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर करणार असून, गोदिया, भंडारा, वर्धा, खामगाव, वाशीम, यवतमाळ, वणी, चिमूर मार्गे ९ ऑक्टोबरला नागपुरात समारोप होणार आहे.  राष्ट्रीय ओबीसी  महासंघाचे महासचिव यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून आता पर्यंत संघटनेने केलेल्या कामाचा आढावा मांडला ,ज्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात ओबीसी मुद्द्याचे समर्थन केले जाईल, त्या पक्षांचे ओबीसी महासंघ स्वागत करेल.
डॉ तायवाडे म्हणाले की, महासंघ संविधानाच्या मर्यादेत राहून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सरकारशी लढा देत आहे. यापुढील काळातही संघर्ष सुरूच राहणार आहे. जात जनगणना हा आपला मुख्य मुद्दा आहे. आता देशातील विरोधी पक्षनेत्यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला आहेत.हे ओबीसींसाठी हे चांगले लक्षण आहे. ओबीसी कोट्यातील मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत ते म्हणाले की, सरकारने त्यांना लेखी आश्वासन दिले आहे.त्यामुळे मराठ्यांना ओबीसी कोट्यातून कधीच आरक्षण मिळू शकत नाही. ते म्हणाले की, महासंघात सर्व राजकीय पक्षांचे सदस्य समाविष्ट आहेत. सर्वांना या संवाद यात्रेत  आमंत्रित केले आहे.ज्या राजकीय पक्षाच्या विधानसभा निवडणुकीतील प्रमुख  जाहीरनाम्यात ओबीसींच्या हिताचे मुद्दे असतील त्या पक्षासोबत ओबीसी समाज राहील. 

सभेला  शाम  लेडे, प्रकाश साबळे, शरद वानखेडे, सुभाष घाटे, गुनेश्वर  आरिकर, ओबीसी योद्धा रवींद्र टोगे ,सुषमा भड, ज्योती ढोकणे, रत्नमाला पिसे, रेखाताई बारहाते,,  उपस्थित होते, या सभेला गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, लातुर , हिंगोली,जालना, गोंदिया, भंडारा, याठीकानाहुन प्रमुख, महिला  ,युवक, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमांचे संचलन रुषभ राऊत यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार निलेश कोडे यांनी केले, बैठकीच्या यशस्वते साठी राजू  चौधरी, रामदास कामडी , कवडू लोहकरे,विनोद हजारे, दिलीप हरणे, राहुल भांडेकर,रुपेश राऊत, घनश्याम अकोले,  आणि इतरांनी सहकार्य केले.

Comments