लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

ब्लास्टिंग मुळे नागरिकांच्या इमारत व मालमत्तेचे नुकसान होऊ नये याची नोंद घ्या

ब्लास्टिंग मुळे नागरिकांच्या इमारत व मालमत्तेचे नुकसान होऊ नये याची नोंद घ्या
 
अन्यथा आंदोलनाचा इशारा छोटू भाई शेख 
यांचा इशारा

 जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

विषय कोळसा खान ब्लास्टिंग मोठ्या प्रमाणात हादरा बसून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण व इमारतीचे नुकसान होत असल्याबाबत

फक्त बातमी 
चेतन लुतडे वरोरा 
 
संदर्भ दैनिक वर्तमानपत्र प्रकाशित झालेले बातमी  नागरिकांमध्ये पसरलेले भीतीचे वातावरण अनुषंगाने 
वरोरा शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेले एकोना गाव येथे काही वर्षांपूर्वी कोळसाखान सुरू झाल्यापासून आतापर्यंत ब्लास्टिंग  मोठ्या प्रमाणात केली जात आहे .

त्यामुळे वरोरा तालुक्यातील कोळसा खान  परिसरातील 30 गाव व वरोरा शहरात नागरिकांमध्ये भूकंप चा झटका असल्याचे  भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
 व तसेच शहर व गावातील घर इमारतीवर भेगा पडून त्यांचे नुकसान होत आहे. अशा जास्तीच्या ब्लास्टिंग मुळे आपल्या परिसरात मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अशी घटना झाल्यास याला जबाबदार कोळसा खान व्यवस्थापन राहणार याची दखल घेण्यात यावी.
 इतर ठिकाणी कोळसाखान मध्ये ब्लास्टिंग करताना एवढा हादरा बसत नाही परंतु इथे जास्त बारूद किंवा खोल ड्रिल मारून जास्तीत जास्त कोळसा काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्फोट केल्याने असा प्रकार होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण व त्यांचे नुकसान होत आहे. तरी सदर मोठे ब्लास्टिंग बंद करून 
कमी प्रमाणात बारूद वापरून ब्लास्टिंग करण्यात यावे जेणेकरून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होऊ नये व नागरिकांच्या इमारतीचे नुकसान होऊ नये याची काळजी घेऊन नागरिकांचा विचार करून सदर काम करण्यात यावा अन्यथा नागरिकांना घेऊन आंदोलन करण्यात येईल .
सदर विषयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ता छोटू भाऊ शेख यांनी कोळसा व्यवस्थापन प्रशासन व खासदार प्रतिभाताई धानोरकर, व जिल्हाधिकारी कार्यालयात  दिले आहे.


Comments