लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

काशीमाय देवस्थान चिरादेवी येथील शिव शंकर मंदीरात चक्क नागाचे दर्शन**नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगासारखे आकार असलेल्या नागांचे भाविकांनी घेतले दर्शन*

*काशीमाय देवस्थान चिरादेवी येथील शिव शंकर मंदीरात चक्क नागाचे दर्शन*

*नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगासारखे आकार असलेल्या नागांचे भाविकांनी घेतले दर्शन* 

अतुल कोल्हे भद्रावती :-
                 तालुक्यातील चिरादेवी येथे निसर्ग रम्य वातावरणात तयार केलेले प्रभू शिव शंकराचे मंदिर आहे. श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचे सण म्हणजे नागपंचमी, नागपंचमीचा इतिहास थोडक्यात सांगायचं झाल्यास कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले. तो दिवस म्हणजे श्रावण शुक्ल पंचमी म्हणून साजरा केला जातो. 
          चिरादेवी येथील काशीमाय देवस्थान येथे आज नागपंचमी निमित्ताने भाविक दर्शनासाठी जात असताना मंदिरामध्ये चक्क शिवलिंग आकारासारख्या कवळ्या नागाचे दर्शन झाले. हि घटना आश्चर्य चकीत असून परिसरात नागरिकांना बघावयास मोह आवरेनासा झाला. कारण आजपर्यंत कधीच मंदिरामध्ये नागाचे दर्शन घडले नव्हते. चिरादेवी येथील नागरिकांचे श्रद्धास्थान म्हणून या मंदिराला ओळखले जाते. 

          या मंदिराची पाश्वभूमीवर म्हणजे ४० वर्षापूर्वी या ठिकाणी पाण्याचा खड्डा होता. आणि त्या खड्ड्यातून सतत पाणी वाहत असे पूर्वी वाहण नसल्यामुळे कोची,घोनाड ,चिरादेवी येथील लोक बाजाराला पायी भद्रावती ला जायचे. येणारे -  जाणारे नागरिक त्या झऱ्याचे पाणी पित होते. मुख्य म्हणजे तो खड्डा बारा ही महिने जसाच्या तसाच भरून दिसत असे. त्यामुळे गावातीलचं स्व. गोंविदा तलांडे यांनी आपल्या कल्पनेतून गायमुख तयार केले आणि तिथेच एक टाकं बांधण्यात आले होते . उन्हाळ्यात जनावरे त्या टाक्यातील पाणी पिऊन ताण भागवत असे. नंतर त्यांनी पिंड वगैरे तयार करून गावकऱ्यांच्या विचार घेऊन १९७६ ला यात्रा सुरू केली. काही वर्षांनंतर तिथे लोकवर्गणीतून शिवशंकराचे मंदिर बांधण्यात आले. आज या ठिकाणाला काशीमाय देवस्थान म्हणून ओळखले जाते. 

       खरतरं कालांतराने पाण्याची पातळी खोलवर गेल्याने पाण्याचा झरा कायमस्वरूपी बंद झाला आहे. गायमुख मध्ये सतत पाणी येत असल्याने ते सुद्धा बंद आहे. आता फक्त परिसरात मंदिरचं प्रसिद्ध असल्याने नागरिक रोज त्याठिकाणी ये - जा करतात. आणि आज चक्क नागाचे दर्शन घडल्याने नागरिकांमध्ये श्रद्धा वाढली असून यावर परिसरात तर्कवितर्क बोलल्या जात आहे..

Comments